आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आधी अलार्म वाजवला, मग केला बेछूट गोळीबार; असे होते दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडातील पार्कलंड शाळेत गोळीबार करणारा हल्लेखोर त्याच शाळेतून काढण्यात आलेला विद्यार्थी होता. शाळेतून काढल्यावरून तो इतका संतप्त झाला की त्याने शाळेवर हल्लाच केला. त्याने जास्तीत जास्त लोकांना ठार मारण्यासाठी स्मोक ग्रेनेड आणि असॉल्ट रायफल आणले होते. सुरुवातीला त्याने फायर अलार्म वाजवला. आगीच्या भितीने जेव्हा विद्यार्थी वर्गाबाहेर येत होते, तेव्हा त्यांना जाणीवही नव्हती निकोलस क्रूझ त्यांच्यावर हल्ल्याची वाट पाहत होता. विद्यार्थी दिसताच त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. यात 17 जणांचा मृत्यू झाला.

 

आणला होता ऑक्सिजन मास्क...
निकोलस आपल्यासोबत केवळ रायफलच नव्हे, तर स्मोक ग्रेनेड सुद्धा घेऊन आला होता. हॉल किंवा वर्गात स्मोक ग्रेनेड फेकून गोंधळ घालणे आणि विद्यार्थ्यांच्या समूहावर हल्ला करणे हा त्याचा कट होता. याचीच तयारी म्हणून त्याने हॉलिवूडपट बॅटमनचा व्हिलेन बेन याचा ऑक्सिजन मास्क देखील आणला होता. 

 

पीडितांच्या गर्दीत गेला पळून...
फायरिंगनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि स्वात टीमने विद्यार्थी व शिक्षकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केला. तेव्हा गर्दीचा गैरफायदा घेत त्या विद्यार्थ्यांपैकी एक होऊन तो पळूनही गेला. या घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून काही अंतरावर अटक केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ल्याच्या वेळी असे होते घटनास्थळावरील दृश्य...

बातम्या आणखी आहेत...