आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Footbalगुहेत अडकले कोचसह 12 फुटबॉल खेळाडू, Football Team Trapped In Flooded Cavel

Thailand: 72 तासांपासून गुहेत अडकले कोचसह 12 फुटबॉल प्‍लेयर, अजूनही बेपत्‍ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- उत्‍तर थायलंडमधील एका गुहेत प्रशिक्षकासह 12 युवा फुटबॉल खेळाडू तब्‍बल 72 तासांपासून अडकले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनूसार, चियांग राई येथे शनिवारी लुआंग गुफेजवळ खेळाडूंचे बुट, सायकल आणि इतर वस्‍तू आढळल्‍या आहेत. यावरुन ते गुफेतच अडकल्‍याची भीती वर्तवण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍या बचावासाठी पुर्ण प्रयत्‍न करत असल्‍याची माहिती थायलंडच्‍या अधिका-यांनी दिली आहे.


गुफेमध्‍ये जाणारा रस्‍ता पावसामुळे बंद झाला. यामुळे आत गेलेले खेळाडू बाहेर येऊ शकत नसल्‍याचे, बचावकार्य पथकाचे प्रवक्‍ता पेतिसेन यांनी सांगितले आहे.  थायलंड लष्‍कराची उच्‍चस्‍तरिय टीम अत्‍याधुनिक साधनांसह खेळाडू आणि कोच यांचा शोध घेत आहे. आत फसलेले सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षीय असल्‍याची माहिती आहे. ते सर्व युवा फुटबॉल टीमचे सदस्‍य आहेत. आपल्‍या 25 वर्षीय कोचसोबत ते गुहा पाहण्‍यासाठी गेले होते.

 

बचाव कार्य पथकाचे प्रवक्‍ता रूएतेवान पेतिसेन यांनी सर्व खेळाडू व कोच जिवंत असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे. मात्र 72 तासानंतरही त्‍यांचा शोध लागू शकला नाही. खेळाडू व कोच यांचे नातेवाईक गुहेबाहेर जमा होत आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, चिंतीत नातेवाईक...

 

बातम्या आणखी आहेत...