आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराष्ट्र दौरा: भारत-स्वीडनमध्ये संयुक्त संरक्षण साहित्य प्रकल्पावर झाली सहमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम- भारत व स्वीडन यांच्यात द्विपक्षीय संबंध बळकट करण्याविषयी उभय देशांत मंगळवारी सामंजस्य करार झाला. मेक इन इंडिया अंतर्गत उभय देश संयुक्तपणे संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्यावर सहमत झाले. त्याचबरोबर दोन्ही देश सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही सहकार्य वाढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे स्वीडनचे समकक्ष स्टिफन लॉफवेन यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.


दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. भारताच्या विकासात स्वीडन कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, यावर उभयतांत चर्चा झाली. मोदी म्हणाले,  आमच्यातील संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्याचे क्षेत्र हाच द्विपक्षीय संबंधाचा मुख्य आधार अाहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात स्वीडनमध्ये त्यांचे जाेरदार स्वागत झाले. स्वीडन-भारत यांच्यात गुंतवणूक, विज्ञान-तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट सिटी इत्यादी क्षेत्रात सहकार्य करण्यावर विचार-विनिमय झाला.  तत्पूर्वी विमानतळावर मोदींचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी स्वागत केले. उभय नेत्यांनी विमानतळाहून एकाच वाहनाने मोदी उतरलेल्या हॉटेलपर्यंतचा प्रवास केला. त्यावरून दोन्ही देशांतील प्रगाढ संबंध दिसून आले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत उभय नेते पायी गेले. 

 

किंग कार्ल यांची भेट  
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, दिवसाची चांगली सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ सोळावे यांची भेट घेतली. उभय नेत्यांत विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावरील विचार मांडले.  

 

आज वेस्टमिन्स्टरमध्ये 
‘भारत की बात, सबके साथ’ कार्यक्रमात मोदी बुधवारी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समुदायाशी संवाद साधणार आहेत. महात्मा गांधी व मार्टिन ल्यूथर किंग या नेत्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार असून त्याचे जगभरात प्रसारण होईल.

 

३० वर्षांनंतर पहिले पंतप्रधान  
स्वीडनला भेट देणारे मोदी हे राजीव गांधी यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. ३० वर्षांपूर्वी १९८८ मध्ये गांधींनी स्वीडनचा दौरा केला होता. सोमवारी सायंकाळी ते स्वीडनमध्ये दाखल झाले.  

बातम्या आणखी आहेत...