आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरा विभागांत नामांकन मिळालेल्या ‘द शेप ऑफ वॉटर’ ला चार ऑस्कर; डिकिन्स ठरले यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस- ९० व्या ऑस्कर पुरस्काराची सोमवारी घोषणा झाली. दिग्दर्शक गिलेरमो देल तोरो यांचा ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपट सर्वात यशस्वी ठरला. या चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर आणि उत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन हंे सन्मान मिळवले. क्रिस्टोफर नोलानच्या ‘डनकर्क’ चित्रपटाला तीन, जो राइट यांच्या ‘डार्केस्ट अवर’ चित्रपटाला दोन ऑस्कर पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

 

फ्रान्सेस मॅक्डोरमंड यांना उत्कृष्ट अभिनेत्री, तर गॅरी ओल्डमॅन उत्कृष्ट अभिनेता ठरले. १३ वेळा हुलाकावणी दिल्यानंतर रॉजर डिकिन्स यांना ‘ब्लड रनर – २०४९’ साठी उत्कृष्ट सिनेमेटोग्राफरचा पुरस्कार मिळाला. ८९ वर्षीय जेम्स आयव्हरी यांना ‘कॉल मी बाय यूअर नेम’साठी उत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीन प्लेचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर मिळवणारे ते सर्वात वयस्कर कलाकार ठरले.

 

> पुरस्कार सोहळ्यात दिवंगत शशी कपूर आणि श्रीदेवी यांना श्रद्धांजली

 

१० मुख्य विभागातील विजेते...
- द शेप ऑफ वॉटर – उत्कृष्ट चित्रपट
- फ्रान्सेस मॅक्डोरमंड – मुख्य अभिनेत्री (थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इबिंग, मिसौरी)
- गॅरी ओल्डमॅन – मुख्य अभिनेता (डार्केस्ट आवर)
- गिलेरमो देल तोरो - दिग्दर्शक (द शेप ऑफ वॉटर)
- एलिसन जॅनी - सह अभिनेत्री (आय, तान्या) 
- सॅम रॉकवेल – सह अभिनेता (थ्री बिलबोर्ड्स)
- ली स्मिथ – उत्कृष्ट एडिटींग (डनकर्क)
- अ फँटास्टिक वुमन फॉरेन लँग्वेज चित्रपट
- पॉल, विआऊ, जेफ्री उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन (शेप)
- जॉन नेल्सन, गर्ड नेफजर, पॉल लेमबर्ट आणि रिचर्ड आर. ह्यूवर व्हिज्युअल इफेक्ट (ब्लेड रनर २०४९)

 

मानव, जलचरांची कथा आहे ‘द शेप...’
द शेप ऑफ वॉटर चित्रपटात मानव व जलचरांच्या संबंधांची कथा आहे. एलिसा (सॅली हॉकिन्स) ही मूकबधिर तरुणी एका प्रयोगशाळेत स्वच्छतेचे काम करत असते. प्रयोगशाळेत टँकमध्ये राहणारे जलचर आणि एलिसा एकमेकांच्या भावना ओळखत असतात. त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्यातील नाते चित्रपटात उलगडण्यात आले आहे. 

 

ऑस्कर विजेते पहिले कृष्णवर्णीय स्क्रीन रायटर जॉर्डन

जॉर्डन पील यांना गेट आऊट चित्रपटासाठी उत्कृष्ट स्क्रीन रायटरचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय स्क्रीन रायटर बनले आहेत. 

 

मार्क ब्रिजेस यांचे सर्वात छोटे भाषण

उत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार मिळवणारे मार्क ब्रिजेस यांनी सर्वात छोटे म्हणजे ३६ सेकंदांचे भाषण दिले. त्यांना १२ लाखांची जेट स्की बक्षीस देण्यात आली. 

 

एनबीए विजेता कोब यांना ऑस्कर

एनबीए विजेता कोबी ब्रायंट यांना ‘डिअर बास्केटबॉल’साठी उत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.

बातम्या आणखी आहेत...