आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 नद्यांमुळे वाढतोय समुद्रातील कचरा, पहिल्या क्रमांकावर चीनची यांगत्जे तर गंगा दुसरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झरलंड - नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे की, जगभरातील समुद्रात आढळणाऱ्या कचऱ्यासाठी 10 नद्या सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यात चीनची यांगत्जे नदी पहिल्या क्रमांकावर आहे. ही चीनमधील सर्वात लांब नदी आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारतातील गंगा नदी आहे. समुद्रामध्ये जो प्लास्टीकचा कचरा मिळाला आहे त्यापैकी सुमारे 90% या 10 नद्यांपासून मिळतो. या 10 पैकी 8 नद्या आशिया खंडातील आहेत. 

 

एनजीटीने म्हटले - गंगा जराही स्वच्छ झाली नाही 
प्लास्टिक कचरा वाहून नेण्यात जगात गंगा नदीचा दुसरा क्रमांक आहे. तर सिंधू सहाव्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने 'नमामी गंगे प्रोजेक्ट' सुरू केला होता. पण नुकतेच एनजीटीने स्पष्ट केले आहे की, गंगेचा एक थेंबही स्वच्छ झालेला नाही. 


संशोधक डॉ. ख्रिश्चियन स्कीमिट यांनी सांगितले की, बहुतांश कचरा नदीच्या किनाऱ्यांमुळे होतो. त्याची विल्हेवाट लावता येत नाही आणि तो नदीतून वाहून समुद्रात पोहोचतो. हेही समोर आले आहे की, मोठ्या नद्यांमध्ये प्रति घन मीटर पाण्यात जेवढा कचरा असतो, तेवढा लहान नद्यांमध्ये नसतो. 


आशियातील सर्वात लांब आणि जागतिक जीवन चक्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या यांगत्जेच्या जवळपास चीनची एक तृतीयांश लोकसंख्या म्हणजे 50 कोटीहून अधिक लोक आहेत. याच नदीतून समुद्रात सर्वाधिक कचरा वाहून नेला जातो. संयुक्त राष्ट्रातील पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रमाचे प्रमुख एरिक सोलहेम यांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये जगातील सर्वाधिक प्लास्टीकचा कचरा होतो. 


चीनने रिसायकलेबल वेस्टची आधी खूप आयात केली. पण नंतर सरकारी धोरणांमुळे ते थांबले. विदेशी कचऱ्यावर बंदी लावताना सर्वात आधी धातूच्या कचऱ्यावर बंदी लावण्यात आली आहे. यावर्षी चीनने 46 शहरांत कचऱ्याला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी दोन वर्षांत 35% कचरा रिसायकल झालेला असेल. 

बातम्या आणखी आहेत...