आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैतानाच्या पुजेसाठी केले BF चे तुकडे, शरिरातील पूर्ण रक्त काढून तुकडे ठेवले फ्रीडमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरियोल - रशियाच्या ओरियोल शहरातील 21 वर्षीय विद्यार्थिनीने तंत्र मंत्रच्या नादात प्रियकराची निर्घृण हत्या केली. अनास्तासिया ओनेजीना हिने 24 वर्षांचा पार्टनर दिमित्री बरोबर शारीरिक संबंधांदरम्यान गळा दाबून त्याची हत्या केली. नंतर त्याच्या शरिराचे तुकडे केले. त्याच्या शरिरातील संपूर्ण रक्त काढले आणि नंतर डोके, पाय, प्रायव्हेट पार्ट आणि बोटे कापून फ्रिजमध्ये ठेवली. सुरुवातीला अनास्तासियाने पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. तिने दिमित्रीला पाहिले तेव्हा त्याचा मृत्यू झालेलाच होता, तिने फक्त बॉडी लपवण्याचा प्रयत्न केला असे तिने सांगितले. पण पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर मात्र तिने ही बाब मान्य केली. कोर्टात म्हणाली, तिला काहीही आठवत नाही. 


तंत्र मंत्रच्या नादी लागून केली हत्या 
आरोपीची चौकशी आणि पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी हे मान्य केले की, ही हत्या तंत्रमंत्रच्या गोंधळात करण्यात आली आहे. अनास्तासिया आणि दिमित्री यांचे कुटुंब आणि मित्रांनी सांगितले की, दोघांचाही तंत्रमंत्र आणि काळ्या जादूवर विश्वास होता. दिमित्री पोलिस कर्मचारी होती. दोघांनी तंत्रमंत्रसाठी एक कम्युनिटीही जॉइन केली होती. पोलिस तपासात आणखी निर्घृण बाब समोर आली. ती म्हणजे, आरोपी तरुणीने मृतदेहाचे तुकडे अशाप्रकारे करण्याचा प्रयत्न केला की, त्यामुळे तो मृतदेह ती पुजा करत असलेल्या शैतानासारखी (baphomet) दिसावी. 


कुंटुंबाने मान्य केले अंधश्रद्धाळू होते दोघे 
मृतक दिमित्रीची सावत्र आई म्हणाली, मला माहिती होते की, दिमित्री आणि त्याची प्रेयसी यांचा तंत्र साधनेवर विश्वास आहे. पण त्यामुळे असे काही होईल असे वाटले नव्हते. मी फक्त त्याच्या कुरळ्या केसांमुळे त्याला ओळखू शकले. मी तज्ज्ञांना विचारले की, दिमित्रीच्या शरिराचे तुकडे जोडून त्याचा अंत्यविधी करता येईल का. पण ते शक्य नसल्याचे मला समजले. रशियामध्ये ताबूतचे झाकण उघडून मृताला दफन केले जाते. पण दिमित्रीच्या शरिराचे तुकडे केलेल असल्याने त्याला जफन केले जाईल. 


कुटुंब म्हणाले ती एकटी नव्हती 
दिमित्रीचे बहुतांश अवयव कापून फ्रीजमध्ये ठवलेले होते. काही तर डस्टबिनमध्ये फेकण्यात आले. पोलिसांना फक्त लिव्हर मिळाले नाही. हे भयानक दृश्य पाहून मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, हे सर्व एकटी मुलगी करू शकत नाही. तिच्याबरोबर नक्कीच कोणीतरी असेल. तंत्रमंत्रशी संबंधित हो लोक असतील असेही तिचे कुटुंबीय म्हणाले. 


अनास्तासिया बरी होण्याची वाट पाहत आहेत पोलिस 
हत्येच्या आरोपात अनास्तासियाला अटक करण्यात आली आहे. पण तिला मानसिक रोगी ठरवण्यात आले आहे. कोर्टाने म्हटले की, आरोपीच्या मानसिक स्थितीत सुधारणा होताच तिच्यावर खटला चालवला जाईल. बरी होईपर्यंत तिच्यावर उपचार केले जाणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...