आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूचे 36 वार करून Ex- बॉयफ्रेंडला संपवले, फक्त या गोष्टीवर होती नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ईस्ट लंडनच्या कॅनिंग शहरात राहणाऱ्या हसना बेगम (25) हिला माजी प्रियकराच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिचा 23 वर्षीय माजी प्रियकर पेट्रो दुसऱ्या एका तरुणीला डेट करत होता. हसना यावर इतकी संतापली, की तिने पेट्रोवर धारदार चाकूने हत्या केली. विषेश म्हणजे, ब्रेक-अप होऊन 6 महिने झाले होते. तरीही पेट्रोने दुसऱ्या मुलीला डेट करू नये असा तिचा आग्रह होता. 

 

माजी प्रियकावर केले 36 वार...
>> हे प्रकरण जून महिन्याचे आहे. एका शॉपमध्ये सहाय्यक म्हणून काम करणारी हसना आणि पेट्रो रिलेशनमध्ये होते. पेट्रो पार्ट टाईम DJ होता. 
>> या दोघांची भेट 2015 मध्ये एका पार्टीत झाली होती. दीड वर्षे अफेअर चालल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रेक-अप केले. 
>> ब्रेकअपच्या 6 महिन्यांनंतर पेट्रो सोशल मीडियावरून दुसऱ्या एका तरुणीला डेट करत आहे असे हसनाला कळाले. हसना इतकी संतप्त झाली की तिने पेट्रोला संपवण्याचाच निर्णय घेतला. 
>> हसनाने पेट्रोला फोन केला. पण, आपला रोष न दाखवता त्याला थंड डोक्याने भेटीसाठी घरी बोलावले. पेट्रो तिच्याशी बोलत असतानाच तिने अचानक त्याच्या छातीत खंजर भोसकला. 
>> पेट्रो धक्क्यातून सावरण्यापूर्वीच हसनाने त्याच्या गळ्यावर आणि छातीवर मरेपर्यंत 36 वार केले. 


पोलिसांनी पकडताच सांगितले हे कथानक...
>> पेट्रोचा खून केल्यानंतर हसना त्याचा मोबाईल घेऊन घरातून पसार झाली. यानंतर आपण पाठवलेले आणि संभाषण केलेले सर्व कॉल आणि मेसेजेस डिलीट केले. 
>> पेट्रो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या भावाने शोध सुरू केला. यानंतर पेट्रोचा मृतदेह पोलिसांनी हसनाच्या घरातून शोधून काढला. 
>> शिक्षेपासून वाचण्यासाठी तिने खोटे कथानक मांडले. पेट्रो आपल्याला ठार मारणार होता. त्याने छातीत लाथ मारली होती. त्यामुळे, आत्मरक्षणासाठी त्याच्यावर चाकूने हल्ला केला असे तिने पोलिसांना सांगितले. 
>> आत्मरक्षणासाठी त्याच्या छातीत 36 वार कसे केले असा प्रश्न कोर्टात वकिलांनी तिला विचारले. त्यावर आपण चाकूने केवळ 3 वार केले असे उत्तर तिने दिले. यानंतर वैद्यकीय अहवालात तिचे दावे खोटे ठरले. आता कोर्टाने तिला 20 वर्षांची कैद सुनावली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...