आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल, अॅपलविराेधात फ्रान्स करणार कारवाई; फ्रान्सचे अर्थमंत्री मायर यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रान्स सरकार गुगल व अॅपलविराेधात कायदेशीर कारवाई करणार अाहे. ट्रान्सअॅटलांटिक संबंधांमुळे व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सला मागे हटण्याची धमकी दिली जात अाहे. त्यासाठी गुगल व अॅपलकडून सुरू असलेल्या अपमानजनक व्यावसायिक प्रथांमुळे फ्रान्स हे पाऊल उचलणार अाहे.  


फ्रान्सच्या स्टार्टअप कंपन्यांना या धमक्या दिल्या जात असून, गुगल व अॅपलसारख्या बड्या संस्था फ्रान्सविरुद्ध अपमानजनक व्यावसायिक प्रथांचा वापर करत अाहेत. अामचा न्यायावर अाधारलेल्या अर्थव्यवस्थेवर विश्वास अाहे; परंतु संबंधित संस्था फ्रान्सविराेधात वातावरण तयार करत अाहेत. त्यांना अाम्ही पॅरिस येथील वाणिज्यिक न्यायालयात अाेढू, असे फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनाे ले मायर यांनी बुधवारी स्पष्ट केले. दाेन्ही कंपन्या अापापल्या अॅपची विक्री करताना स्टार्टअपची अाकडेवारीही गाेळा करून त्यात एकतर्फी व स्वत:च्या साेयीने दुरुस्ती करतात. मात्र, असे करणे अस्वीकार्य अाहे. अॅपल व गुगल या माेठ्या कंपन्या अाहेत; परंतु फ्रान्सच्या स्टार्टअप कंपन्या व त्यांच्या डेव्हलपर्सबद्दल या कंपन्या जी भूमिका घेत अाहेत ती अयाेग्य अाहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अायात केलेल्या स्टीलवरील शुल्कात २५% व अॅल्युमिनियमवरील शुल्कात १०% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामागे हेच कारण अाहे. त्यात युराेपियन राष्ट्रांना सूट मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ट्रम्प हे कराच्या मुद्द्यावर युराेपियन संघाला धमकी देत अाहेत. त्यामुळे ले मायर यांनी फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या दाेन कंपन्यांना विक्रीवर अाधारित कर देण्यास सांगितले अाहे, ज्या युराेपियन देशांत कमी दराने कर देण्यासाठी कायदेशीर बाबींचे खंडन करतात. दरम्यान, अॅपल व गुगलने प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 

...तर लाखाे युराेपर्यंत  हाेऊ शकताे दंड  
याप्रकरणी संबंधित कंपन्यांवर लाखाे युराेंच्या दंडाची कारवाई जाऊ शकते. व्यापारासाठी काही नियम व कायदे अाहेत व त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. फ्रान्सची अार्थिक व कायदा व्यवस्था निश्चित करणे, हे माझे काम अाहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राॅन यांचा भर स्टार्टअप कंपन्या वाढवण्यावर अाहे. अशा कंपन्यांचा विस्तार व्हावा यासाठी कायदे व नियमांत सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली अाहे. त्यामुळे दाेन्ही कंपन्यांची भूमिका स्वीकारली जाणार नाही, असेही मायर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...