आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बँकांच्या कर्जफेडीची तयारी, पण मला कर्जबुडव्यांचा पोस्टरबॉय केले\'; ट्विटरवर मल्ल्याची पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने मंगळवारी नवी चाल खेळली. त्याने आपल्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआय- ईडीच्या कारवाई मागे एखादा एजेंडा असल्याची शंका त्याने व्यक्त केली आहे. टिवटरवर पोस्ट केलेल्या दीर्घ जबाबात माल्याने म्हटले- बँकांची थकबाकी फेडण्याचा प्रयत्न करुनही मला कर्जबुडव्यांचा पोस्टरबॉय केले गेले. माझा कर्ज फेडण्याचा प्रयत्न सुरु असून राजकीय हस्तक्षेप सुरू राहिल्यास, हे कर्ज मला फेडता येणार नाही, असे मल्ल्या म्हणाला. 


तो म्हणाला, १५ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले. परंतु त्याचे उत्तर आले नाही. राजकारण्यांप्रमाणेच माध्यमाने माझ्यावर चोरीचा आरोप करत नऊ हजार कोटी रुपये पळून गेल्याप्रकरणी आरोपी ठरवले. मी दोन वर्षापासून शांत बसलो. परंतु आता माझी बाजू मांडण्याची योग्य वेळ आली आहे, असे त्याने म्हटले. 


सीबीआय व ईडीने सरकार व बँकांच्या इशाऱ्यावरुन माझ्याविरोधात खोटे व बिनबुडाचे आरोप केले आहेत. सत्तेचा हा गैरवापर आहे, असे मल्ल्या म्हणाला. सरकार व गुन्हे शाखाच्या कारवाईपुढे मी हरलो आहे. बँकांचे कर्ज फेडू देण्याची सरकारचीच इच्छा नाही, असा आरोपही त्याने केला आहे. 


थकबाकी फेडण्यासाठी दोन ऑफर दिल्या, एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी फेटाळल्या : माल्या म्हणाला, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांनी किंगफिशर एअरलाइन्सला ५५०० कोटी रुपयाचे कर्ज दिले. मुद्दल व व्याज १२०० कोटी रुपये वसुलीचा दावा केला. थकबाकी भरण्यासाठी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा अर्ज दिले. एक चार हजार कोटी तर दुसरा अर्ज ४४०० कोटी रुपयासाठी होता. एसबीआयच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने इतर बँकांना न विचारता सर्वोच्च न्यायालयातील माझा प्रस्ताव फेटाळला. एसबीआयच्या अध्यक्षांना तीन वेळा अर्ज पाठवून चर्चा करण्याची तयारी दाखवली. 


मालमत्ता विकून पैसे भरण्याची तयारी 
मल्ल्या याने पोस्टमध्ये म्हटले , २२ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन सुमारे १३, ९०० कोटींची मालमत्ता विकून कर्ज फेडण्याची परवानगी मागितली आहे. ईडीने तितक्याच किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. ईडी व सीबीआयने जर या प्रस्तावावर आक्षेप घेतला तर थकबाकी वसुलीसाठी माझ्या विरोधात एखादा अजेंडा असावा, हे स्पष्ट आहे, असा आरोप मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केला आहे. 


नेते, माध्यमांनीच लावले आरोप -माल्ल्या
- माल्ल्याने पीएम मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना 15 एप्रिल 2016 रोजी पत्र पाठवले होते. त्याने सांगितले, "माझ्यावर मीडिया आणि नेत्यांनीच आरोप लावले आहेत. मी 9 हजार कोटी रुपये चोरून पसार झालो असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे कर्ज किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आले होते. कर्ज देणाऱ्या काही बँकांनी सुद्धा मला मुद्दा कर्ज बुडवणारा (विलफुल डिफॉल्टर) असा ठपका ठेवला आहे. जनतेच्या रागाचे मी कारण झालोय हे मला माहिती आहे. अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने मनी लॉन्डरिंग अॅक्ट अंतर्गत माझी आणि माझ्या कुटुंबियांची संपत्ती जप्त केली आहे. त्याचे मूल्यच पाहिल्यास 13,900 कोटी रुपये आहे."
- ईडीने या प्रकरणात विशेष न्यायालयात आरोप पत्र दाखल केला होता. यात सांगण्यात आले आहे, की बँकांच्या कन्सोर्टियमकडून स्टेट बँक ऑफ इंडियाने माल्या आणि इतरांच्या विरोधात 2005-06 मध्ये घेतलेले कर्ज परत केले नाही अशी तक्रार केली. यात 6,027 कोटींच्या महसूलाचे नुकसान झाले आहे. 


2016 मध्ये भारतातून पसार झाला माल्ल्या
31 जानेवारी 2014 पर्यंत किंगफिशर एअरलाइंसवर बँकांचे 6,963 कोटींच्या कर्जाचे ओझे होते. या कर्जानंतर माल्यावर एकूण 9000 कोटींचे ओझे पडले होते. माल्या 2016 मध्ये भारतातून पसार झाला. त्यावेळी त्याने आपल्या मुलांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर तो भारतात परतलाच नाही. भारत सरकारकडून जारी केलेल्या वॉरंटमुळे माल्ल्याला गेल्या वर्षी 18 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...