आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत 22 भारतीयांसह अपहरण झालेल्या जहाजाची सुटका, सुषमा स्वराज यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेनिन / नवी दिल्ली - पश्चिम आफ्रिकेतील बेनिन कोस्ट जवळ 22 भारतीयांसह अपहरण झालेल्या जहाजाची सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. हे जहाज एक ऑईल टँकर जहाज होते. तसेच ते समुद्री लुटारूंनी 1 फेब्रुवारी रोजी हायजॅक केले होते. सुरुवातीला हे जहाज बेपत्ता असल्याचे वृत्त आले होते. 

 

- मरीन एक्सप्रेस नावाचे हे जहाज पनामा देशात नोंदणीकृत आहे. इंटरॅशनल मरीनटाइम ब्युरोने दिलेल्या माहितीप्रमाणे, या टँकरमध्ये 13,500 टन गॅसोलीन भरलेले होते. 
- टँकरचे जेथून अपहरण झाले तो परिसर समुद्री चाच्यांचा आहे. रविवारी शिपिंग महासंचालकांनी या जहाजाशी संपर्क तुटल्याचे सांगितले होते. 
- यापूर्वी जानेवारीत याच परिसरात ऑईल टँकरचे जहाज हायजॅक करण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय सुद्धा होते. त्यांना खंडणी देऊन सोडवण्यात आले होते.
- या जहाजाची सुटका कशी झाली. लुटारूंना अपहरणाची किंमत देण्यात आली किंवा त्यांच्यावर लष्करी कारवाई करून सोडवण्यात आले याचा पत्ता लागला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...