आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात सैनिकांवर हल्ले करण्यासाठी बालकांची भरती करताहेत नक्षली, दहशतवादी -UN

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र - जम्मू काश्मिरात सैनिक आणि पोलिसांवर हल्ले करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन लहान मुलांची भरती करत आहेत. संयुक्त राष्ट्र (यूएन) च्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, गेल्या 3 वर्षांपासून या दहशतवादी संघटना काश्मिरात लहान मुलांचा वापर करत आहेत. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक 15 वर्षीय मुलगा ठार मारल्या गेला. अशाच प्रकारे छत्तिसगड आणि झारखंडमध्ये नक्षलवादी देखील अल्पवयीनांना भरती करत आहेत.


चिल्ड्रन अॅन्ड आर्म्ड काँफ्लिक्ट अहवाल
> यूएनने गुरुवारी 'चिल्ड्रन अॅन्ड आर्म्ड काँफ्लिक्ट 2017' अहवाल सार्वजनिक केला. त्यामध्ये भारताचे तीन राज्य जम्मू-काश्मीर, छत्तिसगड आणि झारखंडमध्ये सुरक्षारक्षक आणि सशस्त्र संघटनांमध्ये होणाऱ्या संघर्षांचा लहान मुलांवर झालेला परिणाम यावर चर्चा करण्यात आली. सरकारने अशा हिंसक संघटनांमध्ये लहान मुलांना सदस्य होण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी.
> 2016 च्या तुलनेत बालहक्क उल्लंघनाची प्रकरणे वाढली आहेत. 2017 मध्ये जगभरात बालहक्क उल्लंघनाच्या 21 हजारांहून अधिक घटना समोर आल्या आहेत. तसेच 10 हजारांहून अधिक लहान मुले अपंग झाली आहेत. नक्षलींचा विचार केल्यास नक्षलवादी संघटनांमध्ये 8 हजार बालकांचा समावेश आहे. बालहक्क उल्लंघनाची सर्वाधिक प्रकरणे इराक, म्यानमार, मध्य आफ्रीकी गणराज्य (CAR), काँगो, दक्षिण सुदान, सीरिया आणि येमेनमध्ये आहेत. 

बातम्या आणखी आहेत...