आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानचे धर्मगुरूशी विवाहबाह्य संबंध होते, खान यांच्या दुसऱ्या पत्नीचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेहाम खान - Divya Marathi
रेहाम खान

इस्लामाबाद - माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानी नेते इम्रान खान यांच्या तिसऱ्या निकाहानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने एक नवा खुलासा केला. विवाहित असतानाही इम्रान आणि 5 लेकरांची आई असलेली धर्मगुरू बुशरा यांच्यात अफेअर सुरू होते. हा दावा इम्रान यांची दुसरी पत्नी राहिलेली रेहाम खान हिने केला आहे. आपल्यासोबत विवाह झाला असतानाही ते बुशराला डेट करत होते असे रेहामने म्हटले आहे. 65 वर्षीय इम्रान खान आणि रेहाम खान यांचा विवाह फक्त 10 महिने टिकला. तसेच इम्रान यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) आपली आध्यात्मिक गुरू बुशरा हिच्याशी गुपचूप लग्न केले. बुशराला पाकिस्तानात पिंकी पीर या नावानेही ओळखले जाते.

 

- 'द टाइम्स' ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रेहामने आपल्या माजी पतीवर आरोप लावले. इम्रान खान आणि पिंकी पीर यांचे अफेअर गेल्या 3 वर्षांपासून सुरू होते. इम्रान भरवसा ठेवण्यालायिकाचा माणूस नाही. 
- इम्रानची दुसरी पत्नी म्हणाली, 'मला माहिती होते, की पिंकी आणि इम्रानचा निकाह 18 फेब्रुवारी नाही तर 1 जानेवारी रोजी झाला. यापूर्वीही त्यांनी माझ्याशी गुपचूप निकाह केला. त्याच्या 2 महिन्यानंतर माध्यमांना फोटो जारी करत घोषणा केली होती."

 

यापूर्वी केले दोन विवाह
- इम्रान खान यांनी यापूर्वी 1995 मध्ये ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमा हिच्याशी विवाह केला. जेमिमाकडून इम्रान यांना दोन अपत्ये आहेत. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 
- 2015 मध्ये इम्रान यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. ते ब्रिटिश टीव्ही अँकर रेहाम खानच्या प्रेमात पडले होते. वर्षभराच्या आत त्यांच्यात तलाक झाला. 

बातम्या आणखी आहेत...