आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये रिव्हर्स व्हेंडिंग मशीन लावली जातेय, त्यात बाटल्या टाकल्यावर प्लास्टिकवर फेरप्रक्रिया होईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- प्लास्टिक व अॅल्युमिनियम कचऱ्यापासून पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी ब्रिटनने नवीन पद्धती अवलंबली आहे. संपूर्ण देशात रिव्हर्स वेडिंग मशीन(आरव्हीएम) बसवली जात आहे. प्लास्टिक व अॅल्युमिनियमच्या बाटल्यांचा वापर केल्यानंतर त्या मशीनमध्ये टाकल्या जाऊ शकतील. मशीन प्लास्टिक-अॅल्युमिनियमची पुनर्प्रक्रिया करेल आणि यासोबत बाटली ठेवणाऱ्यास १४ रुपयांपर्यंत रक्कम दिली जाईल. प्लास्टिक व अॅल्युमिनियमच्या बाटल्या पर्यावरणास मोठे नुकसान पोहोचवतात. सरकारच्या अंदाजानुसार, संपूर्ण देशात आरव्हीएम स्थापन केल्यामुळे नुकसान ६० ते ८५ टक्के कमी होऊ शकते. ब्रिटनचे पर्यावरण सचिव मायकेल गव यांच्या म्हणण्यानुसार, आपण पेय पदार्थांचे कॅन व बाटल्यांची किंमत काही कमी करण्याचा विचार आहे. वाढलेली किंमत एक प्रकारे ग्राहकांची सुरक्षा ठेव असेल. ग्राहकाने बाटलीचा वापर केल्यानंतर ती आरव्हीएममध्ये दिल्यास हीच सुरक्षा ठेव रक्कम त्यांना परत दिली जाईल.  


सध्या ब्रिटनच्या काही बड्या सुपरमार्केटमध्ये ही मशीन लावली आहे. येथील प्रकल्प यशस्वी ठरल्यास तो संपूर्ण देशभर लागू केला जाईल. अशा पद्धतीचा एक प्रकल्प नॉर्वेमध्ये सुरू आहे. ब्रिटनचे उप पर्यावरण मंत्री थेरेसी कॉफे यांनी प्रकल्प जाणून घेण्यासाठी नॉर्वेचा दौरा केला होता. नॉर्वेशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व इस्रायलमध्येही ही योजना सुरू आहे. ज्या देशांत आरव्हीएम मशीनचा वापर होत आहे, तिथे प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचा दर ९०% पर्यंत आहे. म्हणजे देशांत ९०% पर्यंत प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाते.  

ब्रिटनमध्ये दररोज सुमारे ३.५ कोटी प्लास्टिक बाटल्यांची विक्री होते  
ब्रिटनमध्ये दररोज सुमारे ३.५ कोटी प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात. याशिवाय रोज सुमारे २ कोटी अॅल्युमिनियम कॅनची खरेदी होते. यामध्ये ६० टक्क्यांचीच रिसायकलिंग होऊ शकते. डब्ल्यूडब्ल्यूएफ कन्झर्व्हेशन ग्रुपच्या एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये प्लास्टिकचा वापरही वेगाने वाढत आहे. येथे निघणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यात १२ वर्षांत तीनपट वाढ होईल.