आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- भारताचे संरक्षण बजेट प्रथमच जगातील आघाडीच्या ५ देशांच्या संरक्षण बजेटशी बरोबरी करत आहे. लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या (आयआयएसएस) मिलिटरी बॅलन्स २०१८ च्या अहवालानुसार भारतात २०१७ मध्ये ३.३५ लाख कोटी रुपये (५२.५ अब्ज डॉलर्स) संरक्षणावर गुंतवण्यात आले. याबाबतीत भारताने ब्रिटनला मागे सारले आहे. अग्रणी ५ देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
२०१६ मध्ये भारताचे संरक्षण बजेट ३.२६ लाख कोटी रुपये( ५१.१ अब्ज डॉलर्स) होते. तर याच वर्षी ब्रिटनने संरक्षणासाठी ५२.२ अब्ज डॉलर्स खर्च केले होते. २०१७ मध्ये यात घट झाली व ते ५०.७ अब्ज डॉलर्स झाले आहे. या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचा संरक्षणावर सर्वाधिक खर्च होतो. त्यानंतर दुसऱ्या स्थानी चीन आहे. चीनची संरक्षण गुंतवणूक भारताच्या तुलनेत तिप्पट आहे. ९.६१ लाख कोटी रुपये (१५०.५ अब्ज डॉलर्स) चीनने संरक्षणासाठी खर्च केले. वर्ष २०१६-१७ मध्ये चीनची संरक्षणावरील गुंतवणूक २५% वाढली, तर भारताची ही वाढ केवळ २.४ % आहे. आयआयएसएसच्या दक्षिण अाशियाचे वरिष्ठ फेलो राहुल रॉयचौधरी यांनी सांगितले की, भारत आणि ब्रिटनमध्ये सैन्य संतुलनात महत्त्वपूर्ण बदल दिसून येतो. जागतिक संदर्भात भारत, ब्रिटनच्या तुलनेत आपल्या क्षेत्रीय स्रोतांना विकसित करण्यासाठी अधिक गुंतवणूक करत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, आघाडीच्या ६ देशांचे संरक्षण...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.