आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत 5-जी सुरू करणाऱ्या देशांत समाविष्ट होणार, दूरसंचार सचिवांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना - भारत लवकरच ५ जी दूरसंचार सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. सरकार त्यासाठी स्पेक्ट्रमवर काम करत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर मोबाईलवर प्रति सेकंद १ हजार एमबी या वेगाने सुविधा मिळणार आहे, अशी माहिती दूरसंचारच्या सचिव अरूणा सुंदरराजन यांनी दिली. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी त्या स्पेनमध्ये आल्या आहेत.


त्या म्हणाल्या, ५ जीसाठी ३ हजार ५०० मेगाहर्ट्ज व २६ गीगाहर्ट्ज बँडच्या स्पेक्ट्रमवर काम केले जात आहे. आता ४ जी सेवा २ हजार ६०० मेगाहर्ट्जहून कमी फ्रिक्वेन्सी बँडने दिली जाते. फ्रिक्वेन्सी बँड वाढल्यामुळे सिग्नलचे कव्हरेज क्षेत्र आणखी कमी होते. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा ट्रान्समिशनचा वेग वाढवता येणार आहे. सरकारने २०१६ मध्ये ७०० मेगाहर्ट्ज बँडचा लिलाव केला होता. त्याचा वापरही ५ जी सेवेसाठी केला जाऊ शकतो. वास्तविक त्याची किंमत जास्त आहे. त्यामुळे कंपनीने बोली लावली नव्हती.दूरसंचार कंपन्या ऑटोमेटेड कार, रोबोटिक शस्त्रक्रिया, शिक्षणासारख्या क्षेत्रात ५ जी तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करून पाहू लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...