आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • दाक्षिणात्य अभिनेत्रींचे अमेरिकेतील Sex Racket मध्येही नाव Indian Couple Arrested For Running Tollywood Racket In America

अमेरिकेतील Sex Racket मध्ये साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेस, भारतवंशीय दांपत्याला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत भारतवंशीय दांपत्याला सेक्स रॅकेट चालवण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिकागोच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल झालेल्या 42 पानी तक्रारीनुसार, हे दांपत्य साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसना शोजच्या बहाण्याने अमेरिकेला बोलवायचे आणि नंतर देहव्यापाराच्या दलदलीत ढकलून द्यायचे. अमेरिकी पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

 

पीडितांनी सांगितले सत्य...
- तक्ररीत काही पीडिता म्हणाल्या की,  34 वर्षीय श्रीराज चोन्नुपट्टी आणि त्याची पत्नी चंद्रा साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसना बहाण्याने अमेरिकेत शो करण्यासाठी बोलावतात आणि तेथे त्यांच्याकडून बळजबरी देहव्यापार करवून घेतात. 
- श्रीराज आणि त्याची पत्नी तरुणींचा छळही करायचे. त्यांना घाणेरड्या आणि छोट्या-छोट्या अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी मजबूर करायचे. पोलिसांना एका पीडितेची चिठ्ठीही सापडली आहे. ज्यात तिने इंडियन कपलला तिला सोडून देण्यासाठी आणि छळ न करण्याची विनवणी केली होती.
- आरोपी श्रीराज अमेरिकेत एक बिझनेसमन आहे आणि काही तेलुगू चित्रपटांमध्ये त्याने पैसाही लावलेला आहे. पीडिता म्हणाली की, अमेरिकेत होणाऱ्या सांस्कृतिक आणि भारतीय इव्हेंट्समध्ये सहभागी होणारे लोक या दांपत्याचे ग्राहक असायचे.

 

70 कंडोम आणि एक रजिस्टर
- पोलिस म्हणाले की, जेव्हा त्यांनी श्रीराज आणि त्याच्या पत्नीच्या घरी छापा टाकला तेव्हा तेथून अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. वेगवेगळ्या झिपलॉक बॅगमध्ये 70 कंडोम ठेवलेले आढळले होते. दुसरीकडे, चंद्राकडे एक लेजर बुक आढळले. ज्यात अॅक्ट्रेसेस आणि त्यांनी कोणते सेक्शुअल अॅक्ट परफॉर्म केले, ही सर्व माहिती लिहून ठेवलेली होती.
- दांपत्याची तुरुंगात रवानगी झाली असून त्यांच्या जामिनावर स्थगिती आणण्यात आली आहे. या दांपत्याच्या दोन्ही मुलांना व्हर्जिनियाच्या चाइल्ड वेल्फेयर ऑफिसला पाठवण्यात आले आहे.

 

साऊथ इंडियन सिनेमात गाजतोय कास्टिंग काउचचा विषय
मागच्या काही महिन्यांपासून साऊथ इंडियन सिनेमामध्ये कास्टिंग काऊचचे प्रकरण चांगलेच तापलेले आहे. एप्रिलमध्ये अॅक्ट्रेस श्री रेड्डीने याविरुद्ध आवाज उठवला होता आणि हैदराबादेत अॅक्ट्रेसेससोबत मीटिंग केली होती. या मीटिंगमध्ये सांगण्यात आले होते की, काही सेकंदांच्या रोलसाठी चित्रपटक्षेत्राशी संबंधित लोक त्यांचे लैंगिक शोषण करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...