आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BF च्या मदतीने महिलेने रचला पतीच्या हत्येचा कट, सीक्रेट डायरीमुळे झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी भारतीय वंशाच्या एका महिलेला पतीच्या हत्येच्या आऱोपात 22 वर्षे आणि तिच्या बॉयफ्रेंडला हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपात 27 वर्षांची शिक्षा सुानवली. महिलेने पतीला सायनाइड असलेला ऑरेंज ज्यूस पाजला होता. त्याने त्याचा मृत्यू झाला. सीक्रेट डायरीतून पोलिसांना हत्येचा संपूर्ण कट समजला. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. 

 

असे आले समोर..
- ऑस्ट्रेलियन न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार हे प्रकरण ऑक्टोबर 2015 मधील आहे. त्यावेळी 33 वर्षीय सॅम अब्राहम त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. सुरुवातीला हा हार्ट अटॅकचा प्रकार वाटला. पण नंतर विष दिल्याचे समोर आले. 
- अनेक दिवसांच्या तपासात पोलिसांना अनेक पुरावे मिळाले. पोलिसांना सॅमची पत्नी सोफियाची एक सीक्रेट डायरी मिळाली. त्यात तिने अरुण कमलासन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. पोलिसांच्या लक्षात आले की, सॅमच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच सोफिया आणि अरुण यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. दोघे अनेकदा फिरताना आढळायचे. 
- त्यानंतर पोलिसांनी सोफिया आणि अरुणला या प्रकरणी आरोपी बनवले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना दोषी ठरवले. 


कॉलेजमध्ये असल्यापासून होते अफेयर 
मीडिया रिपोर्ट्सनुसार सोफिया आणि अरुण दोघे मूळचे केरळचे आहेत. त्यांचे शिक्षण बरोबरच झाले. त्यादरम्यान त्यांचे अफेयर होते. दोघांचे लग्न मात्र वेगवेगळ्या ठिकाणी झाले. 2012 मध्ये सोफिया 6 वर्षाच्या मुलाबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली. त्यानंतर काही महिन्यांत तिचा पती सॅमही ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला. त्यानंतर एका वर्षाने 2013 मध्ये अरुणही भारतातील पत्नी आणि मुलांना सोडून मेलबर्नला निघून गेला. त्याठिकाणी पुन्हा दोघे जवळ आले आणि त्यांनी हा गुन्हा केला. 

 

बातम्या आणखी आहेत...