आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये भारतीय दुकानदाराची हत्या, फक्त सिगारेटच्या कागदांवरून तरुणांनी घेतला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय पटेल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पत्नी विभा गुजरातमध्ये होत्या. - Divya Marathi
विजय पटेल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी पत्नी विभा गुजरातमध्ये होत्या.

लंडन - येथील पोलिसांनी एका 16 वर्षीय युवकाला 49 वर्षीय भारतीयाच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाचे नाव विजय पटेल आहे. ते 2006 मध्ये भारतातून लंडनला आपले बंधू प्रकाश यांच्याकडे काम करण्यासाठी आले होते. हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी गुजरातमध्ये होत्या. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते दिवसरात्र काम करत होते. त्यांच्याच दुकानात काही युवकांचा समूह आला असताना वाद झाला. त्याच वादात तरुणांनी मारहाण करून विजय पटेल यांचा जीव घेतला. 

 

सिगारेटची कागदे विकण्यास दिला होता नकार
- ब्रिटिश माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पटेल यांच्या दुकानात काही युवक 'रिझला' अर्थात सिगारेटची कागदे विकत घेण्यासाठी आले होते. 
- सिगारेटची ही कागदे तंबाकू, मारिजुआना आणि इतर अमली पदार्थांना गुंडाळून ओढण्यासाठी वापरल्या जातात.
- विशेष म्हणजे, लंडनमध्ये 18 वर्षाखालील युवकांना रिझाल्स विकण्यास सक्त मनाई आहे.
- दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे, त्या युवकांचे वय कमी असल्याचे पाहता. विजय यांनी ओळखपत्र मागितला. पण, त्यापैकी एकाने एक बँक कार्ड काढला.
- विजय यांनी त्याला हे आयडी कार्ड नसून बँक कार्ड आहे. आयडी कार्ड नसेल तर रिझाल्स मिळणार नाहीत असे स्पष्ट सांगितले.
- याचवेळी वाद झाला आणि एक 16 वर्षीय तरुण इतका भडकला की त्याने विजय यांच्या चेहऱ्यावर जोरदार पंच मारला. 
- या हल्ल्यात त्यांचे डोके काउंरवर आदळले आणि रुग्णालयात उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...