आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन : संसदेबाहेर इंग्रजाने शीख बांधवाची पगडी उतरवली, म्हटले-मुस्लिम गो बॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये पार्लामेंटबाहेर एका इंग्रजाने भारतीय शीख व्यक्तीवर हल्ला केला. ते बुधवारी लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांना भेटायला पार्लामेंटला पोहोचले होते. रांगेत उभे राहून आत जाण्यासाठी स्वतःची वेळ कधी येणार याची ते वाट पाहत होते. त्याचवेळी एक इंग्रज व्यक्ती पळत आला आणि 'मुस्लिम गो बॅक' ओरडत तो भारतीय नागरिकाची पगडी काढू लागला. खासदाराने या हल्ल्यावर टीका केली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 


पंजाबी शीख बांधवावर हल्ला..  
- न्यूज एजन्सीच्या मते, पीडित रवनित सिंह (37) मूळचे पंजाबचे राहणारे आहेत. ते ब्रिटनचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांना भेटण्यासाठी पार्लामेंटमध्ये जात होते. 
- त्याचवेळी पोर्टक्युलिस बिल्डिंगच्या बाहेर त्यांच्यावर इंग्रजाने हल्ला केला. याठिकाणी खासदारांचे कर्मचारी आणि पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांना बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता या घटनेची माहिती मिळाली होती. 


इंग्रज म्हणाला - गो बॅक मुस्लिम
- रवनीत सिंह यांनी सांगितले की, मी रांगेत उभा राहून माझी वेळ येण्याची वाट पाहत होतो. याचदरम्यान एक इंग्रज माझ्याकडे पळत आला.  'मुस्लिम गो बॅक' असे ओरडत जोरात तो माझी पगडी ओढू लागला. मी पगडी सांभाळली आणि त्यावर ओरडलो. 
- त्यानंतर हल्लेखोर दुसर्या भाषेत धार्मिक कमेंट करत पळून गेला. मला त्याचे बोलणे नीट समजले नाही. पण मुस्लीम शब्द समजला. 


खासदाराने व्यक्त केले दुःख 
- लेबर पार्टीचे खासदार तनमनजित सिंह धेसी यांनी भारतीय शिखाबरोबर झालेल्या या वर्तनावर दुःख व्यक्त केले आहे. 
- त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, हा प्रकार समजल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले. पोलिस त्याच्या विरोधात कडक कारवाई करतील असे ते म्हणाले. 


आधीही झालेले आहेत शिखांवर हल्ले  
- अमेरिकेच्या 9/11 हल्ल्यानंतर ब्रिटनमध्ये चुकून शीख समाजावर अनेकदा हल्ले झाले. 
- जूनमध्ये एका एअरलाइनच्या को-पॅसेंजरने शिखाच्या पगडीवर हल्ला केला होता. त्यावेळी त्याने शीख व्यक्तीचे फोटो दहशतवादी म्हणून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर लोकांनी आरोपींच्या विरोधात राग व्यक्त केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...