आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत रेस्तरॉमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; संशयितावर 10 हजार डॉलरचे बक्षीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 2017 मध्येही कंसास आणि मिसीसिपीमध्ये गोळीबारात 2 भारतीयांचा मृत्यू झाला होता. 

- अमेरिकेच्या गन कल्चर पर ट्रम्प यांनी संसदेच चिंताही व्यक्त केली आहे. 


कंसास - अमेरिकेच्या कंसास शहरात शनिवारी सायंकाळी एखा रेस्तरॉमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. मृत शरत कोप्पू तेलंगाणाचा रहिवासी होती. कोप्पू यूनिव्हर्सिटी ऑफ मिसौरी-कंसास सिटीमध्ये शिक्षण घेत होता. पोलिसांनी घटनेतील संशयीत आरोपींचा एक व्हिडिओ जारी केला आहे. माहिती देणाऱ्याला 10 हजार डॉलर (सुमारे 7 लाख रुपये) चे बक्षीसही जाहीर केले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी काही चोर शहराती प्रोस्पेक्टस अॅव्हेन्यू येथील एका रेस्तरॉमध्ये गेले होते. त्याठिकाणी त्यांनी चोरी केली आणि फायरिंग करत पळून गेले. रेस्तरॉच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवत पैशआंची मागणी केली. त्यावेळी त्याठिकाणी असलेले सर्व लोक लपायला लागले, पण कोपू त्यावेळी रेस्तरॉच्या मागच्या बाजुला जात होता, त्याचवेळी चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्याला गोळी मारली. 


स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी 
कोपू यांचा भाऊ संदीपने एएनआय या न्यूज एजन्सीबरोबर बोलताना सांगितले की, गुंडांच्या फायरिंगमध्ये शरतला 5 गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. संदीपने सांगितले की, शरत याचवर्षी जानेवारीत अमेरिकेला गेला होता. त्याला युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळाली होती.  सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी संदीपने केली आहे. तसेच शरतचा मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी अमेरिकेच्या दुतावासाला निर्देश देण्याची मागणीही त्याने केली आहे. 


गेल्यावर्षीही दोन भारतीयांची हत्या 
गेल्यावर्षी एका रेस्तरॉमध्ये झालेल्या गोळीबारात 32 वर्षीय इंजिनीअर श्रीनिवास कुचिबोथलाचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 2017 मध्ये मिसिसिपीमध्ये 21 वर्षांच्या संदीप सिंहला त्याच्या घराबाहेर गोळी मारण्यात आली होती. संदीप पंजाबच्या जालंधरचा राहणारा होता. अमेरिकेच्या संसदेला संबोधून बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते, की अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला स्थान नाही. 

बातम्या आणखी आहेत...