आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायमची दुबई सोडून जात होता भारतीय, एका दिवसापूर्वीच लागली 13 कोटींची लॉटरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - एक भारतीय आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीसाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) सोडून जात होता, परंतु फ्लाइटमध्ये बसण्याच्या काही तासांपूर्वीच त्याला तब्बल 19 लाख डॉलर (13 कोटी रुपये) ची लॉटरी लागली. एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

 

सिव्हिल सुपरवायजर म्हणून काम करत होता मॅथ्यू
यूएईची राजधानी अबूधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायजर म्हणून काम करत असलेल्या 30 वर्षीय तोजो मॅथ्यूने भारतात जाणाऱ्या फ्लाइटमध्ये स्वार होण्याच्या एका दिवसापूर्वीच एक लॉटरी खरेदी केली होती. केरळचा रहिवासी मॅथ्यू दिल्लीमध्ये आपल्या पत्नीसोबत राहण्यासाठी यूएई सोडणार होता.

 
बोर्डिंगच्या ठीक आधी खरेदी केली होती लॉटरी
मॅथ्यूने ‘खलीज टाइम्स’ला बोलताना सांगितले, ‘भारतात जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बोर्डिंगच्या ठीक आधी 24 जून रोजी अबूधाबी एअरपोर्टवर एक लॉटरी खरेदी केली. मी माझ्या पत्नीसोबत राहण्यासाठी यूएई सोडणार होतो, मला नवी दिल्लीत जॉब मिळाला होता. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, मला लॉटरी लागली.’ रिपोर्टनुसार, भारतात जाण्यापूर्वीच अचानक मॅथ्यूचे नशीब उजळले आणि त्याला 19 लाख डॉलरची लॉटरी लागली.


मोठे घर खरेदी करण्याचे स्वप्न येईल वास्तवात
मॅथ्यूने म्हटले की, केरळमध्ये एक मोठे घर खरेदी करण्याचे त्याचे स्वप्न होते. तो म्हणाला, ‘हे माझे स्वप्न आहे. आता लॉटरीच्या पैशांतून मी माझे स्वप्न वास्तवात येऊ शकते.’ मॅथ्यू आणि त्याच्या मित्रांना कालच ही बातमी मिळाली, जेव्हा त्यांनी तिकिटाची वेबसाइट चेक केली.


5 इतर भारतीयांचेही उजळले नशीब
या लॉटरीच्या ड्रॉमध्ये आणखी 9 जणांनी 1 लाख दिरहम (27 हजार डॉलर) जिंकले. यात 5 भारतीय, एक पाकिस्तानी आणि एका कुवेती नागरिकाचा समावेश आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये अबूधाबीत झालेल्या लॉटरीच्या ड्रॉमध्ये दुबईत काम करत असलेल्या एका भारतीय ड्रायव्हरनेही 1.1 कोटी दिरहम जिंकले होते.

जानेवारीत यूएईमध्ये कार्यरत केरळच्या रहिवाशाने 1.2 कोटी दिरहम जिंकले होते. हे अबूधाबीच्या लॉटरीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस ठरले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...