आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Indias Quest To Search Safest Nuclear Fuel In Space, To Land On The Dark Side Of The Moon Chandrayan2

चंद्रावर लाखो अब्जांचे इंधन शोधतोय भारत; NASA पोहचू शकला नाही तेथे जाणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रो (ISRO) चंद्राच्या त्या भागावर जाण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या ठिकाणी आतापर्यंत कुणीच पोहोचू शकला नाही. सर्व काही सुरळीत राहिल्यास भारताचे स्पेस मिशन चंद्राच्या काळ्या भागावर लॅन्ड करणार आहे. एकदाची ही मोहिम यशस्वी ठरल्यास भारत पूर्णपणे विघटित होणारे न्युक्लिअर फ्यूल शोधणार आहे. या आण्विक इंधनाची किंमत पृथ्वीवर हजारो-लाखो अमेरिकन डॉलर राहील. परदेशी माध्यमांमध्ये याची जोरात चर्चा सुरू आहे.


...तर, अधिराज्य गाजवणार भारत
> भारताची अंतराळ संशोधन संघटना ISRO ऑक्टोबरमध्ये एक रोव्हर लाँच करत आहे. या रोव्हरचे मुख्य उद्दिष्ट्य चंद्राच्या डार्क साइडवर फिरून त्याच्या पृष्ठभागावरून पाणी आणि हेलिअम-3 चे अवशेष शोधणे आणि त्याचे सॅम्पल गोळा करणे असे आहे. अशा प्रकारचे रसायन पृथ्वीवर अतिशय दुर्मिळ आहे. परंतु, ते चंद्रावर सहज उपलब्ध होऊ शकते. ते इतके दुर्मिळ आणि मोल्यवान आहे, की त्यांच्या मदतीने तयार झालेल्या ऊर्जेतून 250 वर्षे साऱ्या जगात अखंडित वीज पुरवठा होऊ शकतो.
> इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी सांगितल्याप्रमाणे, "प्रत्येक राष्ट्र आणि अंतराळ संशोधन संस्था हा घटक शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु, जो राष्ट्र त्या भागावर पहिल्यांदा यशस्वी पोहोचण्यास यशस्वी ठरेल तोच खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवेल.'' ते पुढे म्हणतात, "आपल्याला त्या प्रक्रियेत फक्त एक सदस्य म्हणून सहभागी व्हायचे नाही. तर, त्या सर्वांच्या पुढे जायचे आहे.''
> अमेरिका, चीन, जपान आणि रशियासह अनेक देश एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या मदतीने त्या भागात सॅटेलाइट लाँच करण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध उद्योजकांच्या मदतीने मानवी मोहिमांसाठी देखील तयारी सुरू आहे. अशात भारताने कुठलाही देश पोहोचला नाही अशा ठिकाणी पोहचून दाखवल्यास भारताची बाजू सर्वात मजबूत होईल. 


चंद्रावर हेलिअम-3 असल्याचे पुरावे
अमेरिकेच्या अपोलो चंद्र मोहिमांमध्ये चंद्रावर हेलिअम-3 असल्याचे पुरावे सापडले आहेत. डिसेंबर 1972 मध्ये अपोलो-17 मिशनसाठी चंद्रावर जाऊन आलेले शास्त्रज्ञ हॅरिसन श्मिट यांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला होता. युरोपियन स्पेस एजंसीच्या मते, ''तेथून मिळालेल्या आयसोटोपच्या मदतीने आणखी स्वच्छ आणि सुरक्षित अणुऊर्जा तयार केली जाऊ शकते. तसेच यातून तयार झालेल्या अणुऊर्जेतून कुठल्याही प्रकारचा अणुकचरा निघत नाही.'' 


चंद्रावर किती हेलिअम?
> चंद्रावर अंदाजे 10 लाख मॅट्रिक टन हेलिअम-3 उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त 25 टक्के अर्थात 2.5 लाख मॅट्रिक टन हेलिअम-3 पृथ्वीवर आणणे शक्य आहे. अशी माहिती नासाच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य गेराल्ड कुलसिंस्की यांनी दिली. 
> तरीही जगासाठी इतके हेलिअम खूप पेक्षा जास्त आहे. यातून जगभरात लागणाऱ्या ऊर्जेच्या गरज अखंडितपणे 200 किंवा 500 वर्षांपर्यंत भागवल्या जाऊ शकतात. एक टन हेलिअम-3 ची किंमत अंदाजे 500 कोटी अमेरिकन डॉलर आहे. पृथ्वीवर आणण्यायोग्य संपूर्ण हेलिअम-3 चा विचार केल्यास त्याची किंमत लाखो अब्ज डॉलर्समध्ये जाईल.


ही तर केवळ सुरुवात
भारताची ही दुसरी चंद्रयान मोहिम आहे. पाण्याचे अवशेष शोधण्यात यशस्वी ठरलेल्या चंद्रयान मोहिमेनंतर भारताने चंद्रयान-2 साठी प्रयत्न सुरू केले. 1982 मध्ये इस्रोत जॉईन झालेले आणि इस्रोचे विद्यमान चेअरमन सिवन यांनी सांगितल्याप्रमाणे, ही तर केवळ सुरुवात आहे. भारत यानंतर अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन आणि चंद्रावर मानवी बेस सुद्धा बनवणार आहे. परंतु, यासाठी सरकारने टाइमलाइन अद्याप तयार केली नाही. आपण तयार असून प्रतीक्षा करत आहोत असे सिवन यांनी सांगितले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...