आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचताना रुमाल जवळ ठेवा.. डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाहीत..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

..त्यांना वाटले ती फक्त थंडी होती. काही दिवसांत सर्वकाही ठिक होईल. पण जसजसे दिवस पुढे जात होते परिस्थिती अधिकच वाईट होत होती. अचानक एक दिवस नोलानचे आई वडील रुथ आणि जोनाथन यांना एक वाईट बातमी कळली. त्यांच्या मुलाला म्हणजेच नोलानला एक अत्यंत दुर्मिळ असा कॅन्सर झाला होता. 


नोलानला सुरुवातीला (सप्टेंबर 2015) नाक बंद होण्याचा त्रास झाला. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. सुरुवातीला रुथ आणि जोनाथलला वाटले की, साधी सर्दी असेल. औषधांनी सर्व काही ठिक होईल, असा विचार त्यांनी केला. पण दोन महिन्यांनी डॉक्टरांनी खुलासा केला की, एका प्रकारच्या ट्युमरमुळे त्याच्या श्वसनात अडथळे निर्माण होत आहेत. हा एक प्रकारचा कॅन्सर होता. अधिक दुर्दैवी म्हणजे त्यावर उपचारही उपलब्ध नाहीत. 


काही दिवसांच्या उपचारानंतरही नोलान अत्यंत अशक्त होत चालला होता. कॅन्सर त्याच्या संपूर्ण शरिरात पसरला होता. कॅन्सर मोठ्याप्रमाणात पसरला तेव्हा नोलानच्या जगण्याची शक्यता 40 टक्क्यांहून 20 टक्क्यांवर आली. 

 

अखेर नोलानची आई रुथने त्याच्या अखेरच्या दिवसांच्या आठवणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. तिला या आजाराचे गांभीर्य सर्वांना सांगायचे होते. रुथ नोलानला जेव्हा अखेरच्या वेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा तो अनेक दिवसांपासून उपाशीच होता. त्याचे कारण म्हणजे त्याने काहीही खाल्ले तरी ते बाहेर पडत होते. त्याला पचतच नव्हते. नोलानच्या अखेरच्या दिवसांविषयी रुथने फेसबूक पोस्टमध्ये वर्णन केले आहे.. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नोलानची संपूर्ण स्टोरी.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा, त्याचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...