आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतापेक्षा तीन पट अधिक चीनचे डिफेन्स बजेट, 8% वाढ, 11 लाख 36 हजार कोटींच्या पुढे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 नंतर येथे तिसऱ्यांदा चीनने डिफेन्स बजेटमध्ये सिंगल बजेट वाढ केली आहे. - फाइल - Divya Marathi
2013 नंतर येथे तिसऱ्यांदा चीनने डिफेन्स बजेटमध्ये सिंगल बजेट वाढ केली आहे. - फाइल

बीजिंग - चीनने डिफेन्स बजेटमध्ये यावेळी 8.1 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनचे डिफेन्स बजेट 175 अब्ज डॉलर (11 लाख 38 हजार 637 कोटी रुपये) होईल. भारताचे सध्याचे डिफेन्स बजेट 52.5 अब्ज डॉलर (3 लाख 41 हजार 538 कोटी रुपये) आहे. चीन सध्या डिफेन्स बजेटच्या बाबतीत अमेरिकेच्या नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


संसदेपूर्वी मीडियात दिली माहिती 
- चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआच्या माहितीनुसार सोमवारपासून सुरू होणाऱ्या 13व्या नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या पहिल्या सेशनमध्ये सादर करण्याआधी ही माहिती मीडियामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्या डिफेन्स बजेटमध्ये 8.1 टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. 
- चीनने गेल्यावर्षी बजेट वाढवून 150.5 अब्ज डॉलर (9 लाख 79 हजार कोटी रुपये) केले होते. 
- 2013 नंतर तिसऱ्यांदा चीनने डिफेन्स बजेटमध्ये सिंगल डिजिटने वाढ केली आहे. 2016 मध्ये 7.6% आणि 2017 मध्ये 7% ची वाढ केली होती. 


अमेरिकाही टॉपवर 
- डिफेन्स बजेटच्या बाबतीत अमेरिका आता जगात टॉपवर आहे. त्यांचे सध्याचे बजेट 602.8 अब्ज डॉलर (39 लाख 21 हजार 515 कोटी रुपए) आहे. 


अनेक देशांशी वाद 
- भारत आणि चीनमध्ये चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची बॉर्डर आहे. त्याबाबतही अनेक ठिकाणी वाद आहेत. नुकताच डोकलाममध्येही अशा प्रकारचा वाद झाला होता. 
- शेनकाकू आयलँड्सबाबत चीनचा जपानशी जुना वाद आहे. दोन्ही देश यावर स्वतःचा हक्क असल्याचा दावा करतात. 
- साऊथ चायना सी (दक्षिण चीन सागर) मध्ये जपान शिवाय व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि मलेशियाशी त्यांचा वाद सर्वश्रुत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत आणि चीनच्या लष्करी ताकदीची तुलना..

बातम्या आणखी आहेत...