आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात रहस्यमयी देशातील नजारा; बांधल्या इतक्या उंच इमारती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - कोरियन युद्धात उद्ध्वस्त झालेली उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगची 6 दशकानंतर पुनर्बांधनी करण्यात आली. सोशलाइट पद्धतीने बांधलेले हे महानगर एक अत्याधुनिक शहर म्हणून प्रस्तुत केले जाते. जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरियाच्या राजधानीतील हे फोटोज येथील आर्किटेक्चरमध्ये परफेक्शन दाखवतात. उल्लेखनीय बाब म्हणजे, उत्तर कोरियाची 90 टक्के लोकसंख्या दारिद्रीशी संघर्ष करत असताना प्योंगयोंगमध्ये त्याची कुठल्याही प्रकारची चिन्हे दिसत नाहीत. 

 

- नॉर्थ कोरियातील बहुतांश इमारती सिमेंट काँक्रीटने बांधण्यात आली आहेत. चीनकडून पोलाद आयात करणे या देशाला खूप महागात पडते. 
- त्यातही देशावर जगभरातून विविध प्रकारचे निर्बंध असताना बांधकामाचे साहित्य निर्यात करणे एक कठिण काम आहे. अशात बाहेरून बांधकामासाठी आणलेली प्रत्येक गोष्ट महागडी असते. या शहरातील इमारती आणि विकासकामांची छायाचित्रे रायटर्सने जाहीर केले आहेत.
- इतकी महागाई असतानाही सरकारने या शहराच्या विकासावर भरमसाठ पैसा खर्च केला आहे. विशेष म्हणजे, अब्जावधी खर्च करूनही या शहरातील लग्जरी हॉटेल आणि इमारती रिकाम्या आहेत. 

- त्यापैकी एक 105 मजली लग्जरी हॉटेलची इमारत गेल्या 27 वर्षांपासून ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. याच शहरात आजी-माजी हुकूमशहांचे मोठ-मोठे पुतळे सुद्धा लावण्यात आले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, उत्तर कोरियाच्या राजधानीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...