आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मिळतो जगातील सर्वात महाग \'पन्ना\', जिवाची बाजी लावतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेशनल डेस्क - ज्योतिषानुसार, पन्ना (Emerald Stone) अर्थात पाचू सर्वात मोल्यवान रत्नांपैकी एक आहे. जगभर विविध ठिकाणी पन्ना आहे. पण, सर्वात महागडा पन्ना कोलंबियात सापडतो. कोलंबियातील मूजो शहराजवळ डोंगराळ जंगलांमध्ये पन्नाच्या अनेक खाणी आहेत. ते शोधण्यासाठी येथील लोक आपल्या जिवाची बाजी लावतात. हिंस्र आणि विषारी प्राण्यांसह अट्टल गँगचा देखील त्यांना सामना करावा लागतो. खाणीत काम करताना कित्येक लोकांचा जीव जातो. 

 

- पन्ना प्रामुख्याने कोळसा खाणींमध्ये सापडतो. पण, ते शोधणे इतके सहज नाही. त्यासाठी कोळशाची बारकाईने छानणी करावी लागते. 
- कोलंबियातील मूजो येथील खाणी डोंगरांनी घेरलेल्या आहेत. तेथे पोहोचणे बाहेरच्या व्यक्तींना अशक्य मानले जाते. 
- ठिक-ठिकाणी विषारी विंचू, साप आणि मोठ-मोठे अजगरांसह हिंस्र प्राणी या सर्वांपासून जीव वाचवावा लागतो. प्राण्यांपासून वाचल्यानंतर त्यांना येथील गुन्हेगारी टोळ्यांचाही सामना करावा लागतो. 
- पन्ना शोधणाऱ्यांच्या अनेक गँग झाल्या आहेत. कुणालाही सापडल्यास त्या गँग आपला दावा करण्यासाठी सज्ज असतात. त्यासाठी शोध घेणाऱ्यांवर नजर देखील ठेवली जाते. 
- कित्येक प्रकरणांमध्ये ज्यांना पन्ना सापडला अशा स्थानिकांना धमकावून, भिती दाखवून स्वस्तात ते खरेदी केले जाते. 
- यासोबत कोळसा खाणींमध्ये होणाऱ्या अपघातांत सुद्धा अनेकांचा जीव जातो. तरीही पन्ना रत्न शोधणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. 

 

असा दिला जातो आकार
क्रोमियम आणि व्हॅनेडियम अशा तत्वांनी पाचूला हिरवा रंग मिळतो. खाणीतून सापडल्यानंतर त्यावर असलेल्या भेगा दूर करण्यासाठी ऑइलिंग आणि पॉलिशिंग केली जाते. पन्नाच्या गुणवत्तेचे निकष त्याच्या रंग, आकार, स्पष्टता आणि कॅरेटवर काढले जातात. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कोळशाच्या खाणीतून असा काढला जातो पन्ना...

बातम्या आणखी आहेत...