आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीखाली वसले आहे हे अजब गाव, येथे सर्व काही अंडरग्राउंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये 4000 वर्षे जुन्या अंडरग्राउंड गावाची छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. या गावात 10 हजार अंडरग्राउंड घरे आहेत. 100 हून अधिक कोर्टयार्ड असलेल्या या गावात 3 हजार लोक आजही राहत आहेत. आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या गावात एकेकाळी 20 लाख लोकांचे घर होते. आता हे गाव पर्यटन नगरी म्हणून विकसित केले जात आहे. जगभरातील लोक लवकरच येथील भुयारी मार्ग आणि अंडरग्राउंड वस्ती पाहू शकतील. 


- चीनमध्ये या गावाला याओदोंग्स नावाने ओळखल्या जाते. यात सध्या 3 हजार लोक राहत आहेत. ज्यांच्या पिढ्या 200 वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. 
- आजच्या काळात मिळणाऱ्या बहुतांश घरातील सुविधा या घरांमध्ये आहेत. यात वीजेसह उपकरणांचा देखील समावेश आहे. 
- गावात लोकांचे राहणीमान सामान्य असले तरीही त्यांच्या घरात मॉडर्न सोयी सुविधा आहेत. येथील अनेक लोक आता दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन वसले आहेत. 
- अंडरग्राउंड घरांमध्ये वेगळे बाथरूम, सिटिंग रुम, बेडरुम आणि शेड इत्यादींसह विविध प्रकारच्या सोयी आहेत. 

 

भूकंपरोधी, साउंड प्रूफ घरे...
- या घरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, भूकंपांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. 4000 वर्षांपूर्वी बांधलेली ही घरे साउंड प्रूफ देखील आहेत.
- बाहेरून आत आणि आतील आवाज बाहेर जात नाही. सोबतच थंडी आणि उन्हाळ्यातही या घरांचे तापमान नियंत्रित राहते. 
- केवळ पावसाळाच नव्हे, तर पुरांपासून वाचण्यासाठी सुद्धा हे घर सक्षम आहेत. या घरांच्या भोवती बांधलेल्या मोठ्या भिंती पाऊस आणि पुरापासून संरक्षण करतात. 
- विशेष म्हणजे, या गावातील भुयारी मार्ग उघडण्याचे काम सुरू आहे. आधुनिक उपकरणांची मदत घेतली तरीही त्या फक्त साफ करण्यासाठी आणि रस्ते पुर्ववत करण्यासाठी 3 वर्षे लागतील. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या गावातील आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...