आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आमचा पाऊस चोरीला जातोय!', इस्रायल ढग अन् बर्फ चोरी करतोय म्हणून देशात दुष्काळ -इराणचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - इराणच्या सैन्यातील एका जनरलने इस्रायलवर आपल्या देशातील ढग अन् बर्फ चोरल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, इस्रायल हा इराणच्या हवामानाशी छेडछाड करत आहे. यामुळेच देशात पाऊस होत नाहीये. इराणचे ब्रिगेडियर जनरल आणि देशातील सिव्हिल डिफेंस ऑर्गनायजेशनचे प्रमुख घोलम रजा जलाली म्हणाले की, इराणमध्ये होत असलेल्या हवामान बदलाबाबत संशय येतो. यात विदेशी हस्तक्षेपाची महत्त्वाची भूमिका आहे. इस्रायल आणि आणखी एक देश याचा प्रयत्न करत आहेत की, इराणवर पावसाळी ढग यावेत मात्र त्यातून पाऊस पडूच नये.

 

'आमच्या देशात बर्फ का नाही?'
जलाली म्हणाले की, आमचे ढग आणि बर्फ चोरीला जात आहेत. अफगाणिस्तान आणि भूमध्य सागरादरम्यान 2200 मीटरचा डोंगराळ भाग हा बर्फाच्छादित असतो, परंतु असे इराणमध्ये होत नाही. तथापि, हे पहिलेच प्रकरण नाही की, जेव्हा इराणमध्ये एखाद्या अधिकाऱ्याने दुसऱ्या देशावर पाऊस चोरीचा आरोप केला आहे. 2011 मध्ये माजी राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद म्हणाले होते की, पश्चिमी देशांमुळे इराणमध्ये दुष्काळ पडला आहे. युरोपीय देश एका विशिष्ट उपकरणाचा वापर करून ढगांना कैद करतात.

 

हवामान विभाग असहमत 
इराणच्या हवामान विभागाचे प्रमुख अहद वजीफे म्हणाले की, जनरल जलाली काय म्हणाले याची मला माहिती नाही. हवामान विभागाबाबत माझी जेवढी माहिती आहे, त्यानुसार कोणताही देश ढग वा बर्फाची चोरी करू शकत नाही. इराण दीर्घ काळापासून दुष्काळाच्या समस्येला तोंड देत आला आहे. ही एक वैश्विक समस्या आहे. ती फक्त इराणबाबतच लागू केली जाऊ शकत नाही. या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून आमची समस्या सुटू शकत नाही. आम्ही समस्येचे समाधान शोधण्याचे प्रयत्न करत आहोत. 

 

बातम्या आणखी आहेत...