आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS मध्ये भरती झालेल्या तुर्कीच्या 16 महिलांना फाशी, 1700 परदेशी महिला अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद - इराकच्या एका न्यायालयाने 16 महिलांना दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सहभाग घेतल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ऑगस्टमध्ये इराकी लष्कराने दहशतवाद विरोधी कारवायांच्या वेळी शेकडो महिलांना अटक केली होती. त्यापैकीच काहींना कोर्टात हजर केले असता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी 1700 महिलांना अटक करण्यात आली. त्या सर्वांवर आयसिसमध्ये सहभागी होणे आणि दहशतवाद्यांना मदत करण्याचे आरोप आहेत. यापैकी काही महिला खास दहशतवाद्यांशी निकाह करण्यासाठी तेथे गेल्या होत्या. त्या आपल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी मोकळ्या आहेत. 

 

आयसिसमध्ये भरती होण्यासाठी परदेशातून आल्या
- जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसने जेव्हा इराक आणि सीरियाचा बहुतांश भाग काबिज केला तेव्हा अनेक देशांतून लोक त्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेले. त्यामध्ये पुरुषांसह महिलांचा देखील मोठ्या संख्येने समावेश होता. त्यापैकी अनेक जणी फक्त दहशतवाद्यांशी निकाह करण्यासाठी गेल्या होत्या. 
- ऑगस्टमध्ये इराकी लष्कराने दहशतवाद विरोधी कारवाया केल्या. त्यावेळी 1300 महिलांनी आत्मसमर्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत 1700 महिलांना अटक करण्यात आली आहे. 
- गेल्या आठवड्यातच कोर्टाने तुर्कीच्या एका महिलेसह 10 परदेशी महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका महिन्यापूर्वी एका जर्मन महिलेला मृत्यूदंड सुनावण्यात आला. 
- डिसेंबर 2017 मध्ये इराक सरकारने आयसिसचा पराभव झाला असून दहशतवाद विरोधी कारवाई संपल्याचे जाहीर केले होते. 

बातम्या आणखी आहेत...