आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंवर पेड न्यूजचे आरोप, हॉलिवुड निर्मात्यांकडून लाच घेतल्याचेही पुरावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला काहीच होणार नाही असैा दावा नेतन्याहू यांनी केला. - Divya Marathi
आपल्याला काहीच होणार नाही असैा दावा नेतन्याहू यांनी केला.

जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात भ्रष्टाचार, पेड न्यूज आणि पदाचा गैरवापराचे आरोप लागले आहेत. पोलिसांनी लावलेल्या आरोपानुसार, त्यांनी एका दैनिकाला आपल्या समर्थनात बातम्या प्रकाशित करण्यासाठी पेड न्यूज छापल्या. प्रसिद्ध हॉलिवुड निर्मात्यांना देशात व्हिसा मिळवून देण्यासाठी तसेच कर माफ करण्यासाठी लाच घेतली. एवढेच नव्हे, तर काही गिफ्ट्सच्या बदल्यात एका ऑस्ट्रेलियन उद्योजकाला फायदा देखील मिळवून दिला. 

 

पेड न्यूज...
- जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायली पोलिसांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी मुबलक पुरावे आहेत असे स्पष्ट केले. 
- पोलिसांच्या आरोपानुसार, नेतन्याहू यांनी आपल्या आणि सरकारच्या धोरणांना जनतेसमोर चांगले प्रस्तुत करण्यासाठी तसेच सकारात्मक बातम्यांसाठी पेड न्यूज दिल्या.
- इस्रायली वृत्तपत्र 'येदियोत अहारोनोत' या दैनिकाला सकारात्मक बातम्यांच्या बदल्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी दैनिकाविरोधात मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी संपादक आर्नन मोझेस याची चौकशी देखील होणार आहे.

 

भ्रष्टाचार, लाच व पदाचा गैरवापर
- पोलिसांनी नेतन्याहू यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप देखील लावले. त्यांनी हॉलिवुडच्या सर्वात मोठ्या प्रोड्युसरपैकी एक आर्नन मिल्चन व इतरांकडून 2 कोटी रुपये रोख आणि इतर गिफ्ट्स घेतले. 
- त्या बदल्यात नेतन्याहू यांनी व्हिसाची विशेष व्यवस्था केली. एवढेच नव्हे, तर संसदेत 'मिल्चन कायदा' मंजूर केला. त्यामध्ये बाहेरून इस्रायलमध्ये स्थायिक होणाऱ्या ज्यूंना 10 वर्षे कर आकारला जाणार नाही. 
- दुसऱ्या एका माध्यमाच्या वृत्तानुसार, एका ऑस्ट्रेलियन उद्योजकाने त्यांना आणि त्यांची पत्नी साराला अनेक भेटवस्तू दिल्या. त्या बदल्यात पंतप्रधानांनी उद्योजकाला फायदा मिळवून दिला. 

 

मला काहीच होणार नाही -नेतन्याहू
- इस्रायलच्या पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा विराजमान असलेले 68 वर्षीय नेतन्याहू यांनी काळजीवाहू पंतप्रधान राहण्यासह एकूण 12 वर्षे हे पद भोगले.
- आपल्यावर आरोप लागताच त्यांनी राष्ट्रीय माध्यमावर संबोधन करत सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्याला काहीच होणार नाही असे नेतन्याहू म्हणाले.
- नेतन्याहू म्हणाले, 'आतापर्यंत माझ्या विरोधात 15 आरोप लागले. कित्येकवेळा माझी चौकशी झाली. पण, एकही सिद्ध होऊ शकला नाही. नवीन आरोपांचे सुद्धा काहीच होणार नाही. मीच या देशाचा पंतप्रधान राहील.'


आता पुढे काय?
- बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर पोलिसांनी मुबलक पुराव्यांच्या आधारे खटला दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. पंतप्रधान नेतन्याहूंवर खटला चालणार किंवा नाही याचा निर्णय अॅटोर्नी जनरल कार्यालय निर्णय घेणार आहे.
- अॅटोर्नी जनरल कार्यालयाचा निर्णय येण्यासाठी महिन्यांचा काळ जाऊ शकतो. इस्रायलचे न्यायमंत्री अयलेत शाकेद यांनी सांगितल्याप्रमाणे, कुठल्याही पंतप्रधानांवर आरोप लागल्याचा अर्थ त्याने राजीनामाच द्यावा असे नाही. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, इस्रायलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदावर असलेल्या आणि निवृत्त झालेल्यांवर, त्यांच्या कुटुंबियांवर कुठलाही खटला चालणार नाही असा कायदा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- इस्रायलमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर 2019 मध्ये होणार आहे. निवडणुकींवर या आरोपांनी काहीच परिणाम होणार नाही असा दावा नेतन्याहू यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...