आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजकार्ता - इंडोनेशियातील जकार्ता स्टॉक एक्सजेंच टॉवरचे एक अख्खे फ्लोर अचानक कोसळले. या दुर्घटनेत किमान 75 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये दैनंदिन दलाल आणि कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा एक समूह सुद्धा प्रॅक्टिकलसाठी गेला होता. जखमींमध्ये त्यांचा देखील मोठ्या संख्येने समावेश आहे. या अपघातानंतर इमारतीमध्ये सर्वत्र फक्त कोसळलेल्या फ्लोरचा ढीग दिसून येत होता. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये वरच्या मजल्यावरील गॅलरीत आणि खालच्या मजल्यावर सुद्धा लोकांची गर्दी दिसून येत आहे. वरच्या गॅलरीत लोक लिफ्टची वाट पाहत होते. काही लोक पुढे गेले. मग, लिफ्ट येताच पुन्हा मागे लिफ्टच्या दिशेने पोहोचले. त्याचवेळी अचानक गॅलरीसह अख्खे फ्लोर कोसळले. यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त इमारतीचा ढिगारा आणि लोकांच्या किंचाळ्या ऐकायला येत होत्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना घटनेच्या वेळी हादरे जाणवले. मात्र, तूर्तास प्रशासनाने भूकंपाची शक्यता नकारली आहे. तसेच या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ आणि आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.