आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flood: जपानमध्ये पूराचे थैमान; 112 जणांचा बळी, 19 प्रांतातील 59 लाख नागरिकांना फटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोक्यो - जपानमध्ये अतीवृष्टी आणि पूरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सोमवारी 112 पर्यंत गेला आहे. जपानच्या एकूण 47 प्रिफेक्चर (प्रांत) पैकी 19 प्रांतांमध्ये 59 लाख नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. पंतप्रधान शिनझो अॅबे यांनी बचावकार्यात लागलेल्या स्वयंसेवी आणि सैनिकांची संख्या 73000 पर्यंत वाढवली आहे. अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार, सद्यस्थितीला 23 हजार लोक शिबीरांत आश्रय घेऊन आहेत. तर एकट्या ओकायामा प्रांतात 1000 हून अधिक नागरिक छतांवर मदतीची वाट पाहत आहेत. 


2 लाख 37 हजार घरे उद्ध्वस्त, वाहतूकीचा खोळंबा
जपान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यामागूची, क्योटो, गिफू, शिगा कोची, फुक्वाका आणि कागोशिमा येथे सर्वाधिक जीवितहानीची नोंद झाली आहे. सलग आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, 11 ते 19 प्रांतांमध्ये पूर आले आहे. 23,000 नागरिक शिबीरांमध्ये थांबले इतरांना बाहेर काढण्यासाठी 73000 कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत जवळपास 2.5 लाख घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच देशभरातील 13 रेल्वे मार्ग आणि 37 महामार्ग पूर्णपणे बंद आहेत. पुरामुळे सरकारने मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे रद्द केले आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, जपानमध्ये पुराच्या तांडवाचे काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...