आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही छत्री हातात धरण्याची गरज नाही! जपानी कंपनीने विकसित केली Flying Umbrella

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोक्यो - जपानच्या एका आयटी कंपनीने अशी छत्री बनवली आहे जी हातात धरावी लागणार नाही. आणप कुठेही जाल त्या ठिकाणी ही छत्री आपल्या डोक्यावर उडत राहील. या छत्रीमध्ये एक ड्रोन आणि सेन्सर लावण्यात आले आहेत. जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या हालचालींचे अनुकरण करून ती छत्री त्याच्या डोक्यावर उडत राहणार आहे. सद्यस्थितीला 5 किलो वजन असलेली ही छत्री सलग 5 मिनिटे उडू शकते. 2020 पर्यंत याचा वापर निरंतर आणि व्यावहारिकरित्या करता येईल असा कंपनीचे प्रयत्न आहे. कंपनीचे अध्यक्ष केंजी सुझुकी यांनी सांगितल्याप्रमाणे, अशा प्रकारची छत्री बनवण्याची कल्पना 3 वर्षांपूर्वी आली होती. एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात व्यवस्त असतानाही छत्रीने आपले काम करत राहावे हा यामागचा हेतू होता.


कंपनीसमोर अजुनही ही आव्हाने
ही छत्री ड्रोन तंत्रज्ञानावर बनवण्यात आली आहे. जपानच्या सिव्हिल एअरोनॉटिक्सच्या नियमानुसार, ड्रोनचा वापर सार्वजनिक ठिकाणी करत असताना व्यक्ती आणि इमारतींपासून ते 30 मीटर दूर ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला या छत्रीचा वापर फक्त खासगी संस्थांमध्ये करता येईल. कंपनीने आता या छत्रीच्या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. जेणेकरून याचा वापर आणखी सहज बनवता येईल. केंजी सुझुकी यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रोटोटाइपमध्ये काही अडचणी दिसून आल्या आहेत. वजन अधिक असल्याने तो जास्त वेळ उडवता येत नाही. सोबतच एखादी व्यक्ती हळू चालत असेल तर ही छत्री त्याच्या हालचालींना मॅच करू शकत नाही. या छत्रीच्या कपड्यावर सुद्धा संशोधन केले जात आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...