आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो 7 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; शुक्रवारी घेणार मोदींची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा / नवी दिल्ली - कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो शनिवारपासून 7 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांसाठी हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. जस्टिन यामध्ये कॅनडात राहणाऱ्या 14 लाख भारतीयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. तसेच भारतासोबतच्या संबंधांना मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. या दरम्यान भारत आणि कॅनडामध्ये गुंतवणूक व औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचे करार होणार आहेत. 

 

भारत दौऱ्यापूर्वी ट्वीट केला फोटो...
- कॅनडा ते भारताचा प्रवास सुरू करण्यापूर्वी जस्टिन यांनी आपला एक फोटो ट्वीट केला. त्यामध्ये ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत दिसून येतात. या फोटोसह त्यांनी लिहिले, "भारताच्या बिझी दौऱ्यासाठी तयार, दोन्ही देशांमध्ये मजबूत मैत्री संबंध आणि नोकऱ्या निर्माण करण्याकडे लक्ष राहील." 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, कॅनडात भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्याची प्रचिती त्यांच्या कॅबिनेटमध्येही दिसून येते. तेथील परराष्ट्र मंत्री क्रिस्टिया फ्रीलंड, सायन्स अॅन्ड इकोनॉमिक डेव्हलपमेंट मिनिस्टर नवदीप बॅन्स, संरक्षण मंत्री हरजीत सिंग सज्जन, सायन्स अॅन्ड स्पोर्ट्स मिनिस्टर कर्स्टी डंकन आणि पायाभूत विकास मंत्री अमरजीत सोही असे 5 भारतीय कॅबिनेटमध्ये समाविष्ट आहेत. 

 

असा आहे दौऱ्याचा प्लॅन...
- जस्टिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शुक्रवारी अर्थात 23 फेब्रुवारीला भेट होणार आहे. त्यामध्ये आर्थिक गुंतवणुकीसह औद्योगिक करार होण्याची शक्यता आहे. 
- ताजमहाल पाहण्यासोबतच ते साबरमती आश्रम आणि आयआयटी अहमदाबाद येथे संवाद साधतील. यासोबतच मुंबईतील उद्योजकांच्या ते भेटी घेणार आहेत. यानंतर अमृतसर येथील स्वर्ण मंदिराची भेट घेतल्यानंतर दिल्लीत त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...