आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • कंसास फायरिंग: भारतीय इंजिनिअरच्या हत्याऱ्यांना 78 वर्षांची कैद Kansas Shooting US Man Who Killed Indian Techie Srinivas Kuchibhotla Sentenced To Life

कंसास फायरिंग: भारतीय इंजिनिअरच्या मारेक-याला 78 वर्षांची कैद, 100 वर्षे वयापर्यंत मिळणार नाही पॅरोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- 22 फेब्रुवारी 2017 रोजी सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला यांची कन्सासच्या मध्ये हत्या करण्यात आली होती.
- दोषी ठरवण्यात आलेले माजी नेव्ही ऑफिसर यांनी नसली टिप्पणीही केली होती.
 
कन्सास - अमेरिकी कोर्टाने भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला (32) यांच्या हत्येतील दोषी माजी अमेरिकी नेव्ही ऑफिसर अॅडम पुरिन्टन (52) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुरिन्टन याला 78 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याला 100 वर्षे वयापर्यंत पॅरोलही मिळणार नाही. यापूर्वी कोर्टाने मार्चमध्ये पुरिन्टन दोषी मानले होते. मागच्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी ओलाथे येथील ऑस्टिन बार अँड ग्रिल बारमध्ये क्षुल्लक वादानंतर अॅडमने श्रीनिवासवर फायरिंग केली होती. नंतर श्रीनिवास यांचा मृत्यू झाला. त्यांचे मित्र आलोक मदसानी जखमी झाले होते.
 
फर्स्ट डिग्री मर्डरचा दोषी
- कोर्टाने पुरिन्टन यांना श्रीनिवास यांच्या फर्स्ट डिग्री मर्डरचे दोषी ठरवले.
- श्रीनिवास यांच्या पत्नी सुनयना दुमाला यांनी कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, निकालामुळे माझे पती परत येणार नाहीत, परंतु यामुळे संदेश जरूर जाईल की, द्वेषाला कधीच स्वीकारले जाणार नाही.
 
- "मी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिस आणि ओलाथे पोलिसांचे आभार मानते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे मला न्याय मिळाला."
 
3 प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले होते?
1) घटनेच्या वेळी तेथे हजर एक व्यक्ती म्हणाली, "पुरिन्टन दोन्ही भारतीयांवर वांशिक टिप्पणी करत राहिला. सोबतच म्हणाला की, ते परकीय आहेत."
2) मदसानी म्हणाले, "मी मॅनेजरकडे गेलो आणि याची तक्रार केली. यानंतर आरोपीला बारमधून बाहेर काढण्यात आले."
3) एका ऑफिसरच्या मते, "थोड्यावेळाने पुरिन्टन बाहेरून परत आला आणि दोन्ही भारतीयांवर गोळ्या झाडल्या. 24 वर्षीय इयान ग्रिलट नावाच्या व्यक्तीने दोन्ही भारतीयांना वाचवण्याचा प्रयत्नही केला. यात ते स्वत:ही जखमी झाले."
 
काय झाले होते 22 फेब्रुवारीच्या रात्री?
- श्रीनिवास आणि आलोक मदसानी ओलाथेमध्ये जीपीएस निर्मिती करणारी कंपनी गार्मिनच्या एव्हिएशन विंगमध्ये काम करत होते.
- 22 फेब्रुवारीच्या रात्री ओलाथेच्या ऑस्टिन बार अँड ग्रिल बारमध्ये होते. तेव्हा यूएस नेव्हीतून निवृत्त अॅडम पुरिन्टनने त्यांच्याशी वाद छेडला.
- अॅडम वांशिक टिप्पणी करू लागला. त्याने दोघांना दहशतवादी म्हटले. म्हणाला की, माझ्या देशातून निघून जा. तुम्ही माझ्या देशात का आला आहात? तुम्ही आमच्यापेक्षा कसे चांगले आहात?
- वादानंतर अॅडमला बारमधून हाकलण्यात आले. थोड्याच वेळात तो गन घेऊन परतला आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. यात श्रीनिवास यांचा मृत्यू झाला आणि मदसानी जखमी झाले.
- याच्या 5 तासांनंतर अॅडम दुसऱ्या बारमध्ये मद्यपानासाठी पोहोचला. तेथे त्याने लोकांना सांगितले की, मिडल-ईस्टच्या दोघांना ठार करून आलो आहे आणि लपण्यासाठी जागा पाहिजे. बार टेंडरने पोलिसांना बोलावून त्याला अटक करवली.  
बातम्या आणखी आहेत...