आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केन्यातील मुख्य बाजारपेठेत आगडोंब, 15 जणांचा होरपळून मृत्यू, किमान 50 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅरोबी - केन्याची राजधानी नॅरोबीत असलेल्या मुख्य बाजारपेठेत अचानक मोठी आग लागली आहे. आग इतकी भयंकर आहे, की काही मिनिटांतच ती अनेक इमारतींपर्यंत पसरली. प्राथमिक वृत्तानुसार, या दुर्घटनेत किमान 15 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 50 हून अधिक नागरिक जखमी आहेत. ही आग जिकोम्बा मार्केटमध्ये लागली असून ते राजधानीतील सर्वात मोठे खुले मार्केट आहे. काही स्थानिक माध्यमांनी या आगीचे कारण दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 

 

 

मृतांपैकी काहींचा मृत्यू होरपळून तर काहींचा गुदमरून झाला आहे. मार्केटमध्ये अधिक वर्दळ असली तरीही बाहेर पडण्यासाठी जास्त रस्ते नाहीत. त्यामुळे, आगीनंतर गुदमरून आणि चेंगराचेंगरीत अधिक जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळाचे काही फोटो नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये आगीत जखमी झालेल्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असल्याचे दिसून येते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो...

बातम्या आणखी आहेत...