आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 65 वर्षांत पहिल्यांदा दक्षिण कोरियात पोहोचला उत्तर कोरियाचा हुकूमशहा Kim Jong Un Becomes First North Korean Leader To Reach South Korea News And Updates

65 वर्षांनंतर उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दक्षिण कोरियाचे केले असे सीमोल्लंघन..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तांदोलनासाठी  उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाेंग उन शत्रुत्वाला मैत्रीत रूपांतरित करण्यासाठी द. कोरियाच्या पनमुनजोमच्या सैन्य सीमारेषेवर पोहोचले. तेव्हा राष्ट्राध्यक्ष मून जेई अगोदरपासूनच प्रतीक्षेत होते. मून यांनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले. - Divya Marathi
हस्तांदोलनासाठी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाेंग उन शत्रुत्वाला मैत्रीत रूपांतरित करण्यासाठी द. कोरियाच्या पनमुनजोमच्या सैन्य सीमारेषेवर पोहोचले. तेव्हा राष्ट्राध्यक्ष मून जेई अगोदरपासूनच प्रतीक्षेत होते. मून यांनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले.

पनमुनजोम - उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाने शुक्रवारी इतिहास लिहिला. १९५३ मध्ये कोरिया युद्धाच्या ६५ वर्षांनंतर पहिल्यांदाच उ. कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाऊल ठेवले होते. किम जाेंग उन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई इन यांची भेट घेण्यासाठी पनमुनजोमला आले होते. उभय नेत्यांत पीस हॉलमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी सीमेवर वृक्षारोपण केले. सायंकाळी भोजन व गुप्त चर्चाही केली. संयुक्त वक्तव्यात दोन्ही नेत्यांनी आता युद्ध नव्हे, शांततेचे युग सुरू झाल्याचे जाहीर केले. कोरिया क्षेत्र अण्वस्त्रमुक्त करण्याचा संकल्पही केला. 

 

शांततेचे घोषणापत्र  
* कोरिया क्षेत्रास अण्वस्त्रांपासून मुक्त केले जाईल.  
* सरहद्दीवर अपप्रचार बंद करू. सैन्य क्षेत्राचे शांतता क्षेत्रात रूपांतर करणार.  
* दोन्ही देशांच्या सीमांमुळे ताटातूट झालेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणणार.  
* शत्रुत्वातून होणाऱ्या कारवाया बंद होणार.  
* दोन्ही देशांमध्ये रस्ते व रेल्वेद्वारे संपर्क वाढवण्यावर आता भर.   

 

किम मूनला म्हणाले, मी थंडगार  नूडल्स आणलेत, आस्वाद घेऊया  
किम व मून यांच्यात हास्यविनोदही झाले. किम म्हणाले, मी उत्तर कोरियाचे प्रसिद्ध थंडगार नूडल्स आणले आहेत. तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. संपूर्ण जगाचे डोळे आणि कान पनमुनजोमकडे लागले आहेत. मला काही तरी तोडगा काढायचाय. तेव्हा किम यांनी गेस्ट बुकमध्ये आतापासून शांतीचे युग सुरू होत आहे. नवा इतिहास सुरू होताेय, असे लिहिले. 

 

कोरियाच्या युद्धात ९ लाख सैनिक, २५ लाख नागरिकांचा मृत्यू  
* पनमुनजोम हे उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व अमेरिकेच्या सैनिकांचे दररोज भेटण्याचे एकमेव ठिकाण आहे.  
* कोरियाच्या युद्धात उत्तर कोरिया व त्याच्या मित्रराष्ट्रांचे ७.५ लाख, तर दक्षिण कोरिया व त्याच्या मित्रराष्ट्राचे १.७८ लाख सैनिक मृत्युमुखी पडले होते.  
* युद्धात २५ लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. युद्ध १९५० ला सुरू झाले होते. १९५३ पर्यंत ते चालले होते.  
* अगोदर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष २००० व २००७ मध्ये उत्तर कोरियाला भेट देऊन आले होते.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...