आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात कट्टर शत्रू देशांचे नेते एकमेकांना भेटले तेव्हा, 70 वर्षांतील अतिशय दूुर्मिळ योग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयोंग - जगातील कट्टर शत्रू राष्ट्र म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांची दुर्मिळ भेट मंगळवारी संपन्न झाली. उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात डिनरसाठी आमंत्रित केले होते. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सत्ता सांभाळली तेव्हापासून दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेण्याची ही पहिलीच भेट आहे. कोरियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांनी शेजारील शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियासोबत मैत्री संबंध वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

 

काय म्हणाले किम जोंग उन...
- दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे शिष्टमंडळ उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष भवन परिसरात मंगळवारी आले. तेव्हा खुद्द किम जोंग उन आणि त्यांच्या पत्नी री सोल जू यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. 
- डिनर हॉलमध्ये किम जोंग उन, त्यांची पत्नी आणि उत्तर कोरियात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासोबत भोजन केले. 
- या दरम्यान उत्तर कोरियाचे नेते प्रत्येक फोटोमध्ये शेजारील शत्रू राष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन आणि स्मितहास्य करताना दिसून आले. 
- गेल्या 7 दशकांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरीही उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिणसोबत चांगले मैत्री संबंध वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. 3 तास चाललेल्या या भेटीत त्यांनी विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा देखील झाली.
- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष आणि किम जोंग उन यांचे आजोबा किम इल संग यांनी वेळोवेळी दोन्ही देशांच्या मिलनाचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर सत्तेवर आलेले किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांनी कट्टर राष्ट्रवादाची भूमिका घेतली. दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाला बोलावून किम जोंग उन यांनी आपल्या आजोबांचे धोरण अंगीकारले आहे.


पुढील स्लाइड्सवर वाचा, का म्हटले जातात जगातील सर्वात कट्टर शत्रू राष्ट्र...

बातम्या आणखी आहेत...