आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

End of the world: 27 जुलैला ब्लड मून, जगाचा अंत होणार असल्याचा अमेरिकी पाद्रीचा खळबळजनक दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - 27 जुलै रोजी या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण होणार आहे. यादरम्यान जगभरातील अनेक देशांमध्ये लाल रंगाचा चंद्र दिसणार आहे. याला 'ब्लड मून' म्हटले जाते. ग्रहणाचा काळ 1 तास 43 मिनिटांचा असेल, तर दाव्यानुसार याचा लाल रंग तब्बल 4 तासांपर्यंत राहील. यानिमित्ताने जगभरात अफवांना पेव फुटले आहे. परदेशात काही जण याला बायबलशी जोडून जगाच्या अंताची सुरुवात असल्याचे सांगत आहे. दावा केला जात आहे की, जगासाठी हे ग्रहाण वाईट काळ घेऊन येईल. Christian conspiracy theorist च्या मते, हा ब्लड मून इस्रायलपासून मिडिल ईस्टपर्यंत दिसेल. याचा सर्वात जास्त परिणामही तेथेच पाहायला मिळेल. या थेअरीवर विश्वास ठेवणाऱ्या अमेरिकी पाद्री पॉल बॅगली म्हणाले की, हे शतकातील सर्वात जास्त वेळेचे आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल, जगाचा अंत खूप जवळ आला आहे. बॅगलीने म्हटले, "मला वाटत नाही की, या शतकानंतर दुसरे एखादे शतक येईल." 

 

सुरू होतील नैसर्गिक आपत्ती...
- बॅगली यांनी एका व्हिडिओतून पुढे सांगितले की, ब्लड मून आणि या ग्रहणामुळे जगभरात भूकंप, वादळ, ज्वालामुखी विस्फोट यासारख्या नैसर्गिक आपत्तीही येतील. ज्यात लोक किड्या-मुंग्यांसारखे मृत्युमुखी पडतील आणि अशा घटना वेगाने वाढतील. तथापि, या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

 

या कारणामुळे लाल दिसणार चंद्र...
- ग्रहण काळादरम्यान पृथ्वीची छाया चंद्रावर पडेल. यादरम्यान सूर्याचा प्रकाश यामुळे प्रभावित होईल, ज्यामुळे चंद्र लाल ते नारंगी रंगाचा दिसायला लागेल. ग्रहण हटताना हळू-हळू हा रंग परत येईल. कमीत कमी 3 महाद्विपांमध्ये स्पष्टपणे पाहिला जाऊ शकेल. आंशिक चन्द्रग्रहण 2 तास 12 मिनिटे (22:24 पासून रात्री 2:19) तर पूर्ण चंद्रग्रहण 1 तास 43 मिनिटे (रात्री 23:30 पासून रात्री उशिरा 1:13) पर्यंत असेल.

 

 

बातम्या आणखी आहेत...