आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • पेरूमध्ये जगातील सर्वात मोठे नरबळी स्थान, सापडले 140 बालकांचे अवशेष Largest Known Child Sacrifice Site Found In Peru Las Lamas

पेरूमध्ये जगातील सर्वात मोठे नरबळी स्थान, सापडले 140 बालकांचे अवशेष, 550 वर्षे जुने असल्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पेरूची राजधानी लीमापासून 500 किमी अंतरावर त्रुजिलो शहरात आहे बळी स्थळ

- नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या जागेवर 2011 पासून करत आहे उत्खनन

 

पेरू - पुरातत्त्ववाद्यांनी पेरूमध्ये जगातील सर्वात मोठे बळी स्थान आढळल्याचा दावा केला आहे. राजधानी लिमापासून 500 किमी अंतरावरील त्रुजिलो शहराजवळ आढळलेल्या या जागेचे नाव लास लामास आहे. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या संशोधकांना येथे 140 बालकांचे अवशेष आढळले. येथे कधीकाळी चिमू संस्कृती होती. दावा केला जात आहे की, 550 वर्षांपूर्वी येथे एकाच वेळी 200 हून जास्त जणांचा बळी देण्यात आला होता. यात लहान मुलांसोबतच तरुणांचाही समावेश होता.

 

पुरामुळे देण्यात आला बालकांचा बळी
- पेरू नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर गेब्रियल प्रिटो यांच्या मते, बळी देण्याची जागा चिमु साम्राज्यातच उभारण्यात आली होती. असे मानले जाते की, अल नीनोमुळे पेरूजवळील समुद्रात वादळ आले होते, यामुळे त्रुजिलोमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यापासून वाचण्यासाठीच लोकांनी देवापुढे आपल्या मुलांचा बळी दिला होता.

- गेब्रियल म्हणाले की, बळी स्थळावर आढळलेल्या बालकांचे अवशेष समुद्राकडे शिर केलेले होते, म्हणजेच त्यांना या प्रकारचे दफन करण्यात आले होते.

 

कसे कळले, बालकांचा बळी देण्यात आला?
- रिपोर्ट्सनुसार, बालकांच्या हाडांमध्ये जखमांचे व्रण आहेत. सोबतच त्यांच्या अनेक फासळ्याही मोडल्या आहेत. यावरून कळते की, त्यांचे हृदय काढण्यात आले होते.  
- याशिवाय त्यांच्या अवशेषांवर गडद लाल रंगाची लेयर आढळली. यावरून त्यांना एका अनुष्ठानानंतर मारण्यात आल्याचा अंदाज येतो.

 

2011 मध्ये शोधाला सुरुवात
- लास लामासमध्ये 2011 मध्ये पहिल्यांदा खोदकाम सुरू करण्यात आले होते. तेव्हा येथे खोदकामादरम्यान फक्त 42 मुले आणि 76 लामांचे अवशेष आढळले होते. तथापि, या आठवड्याच्या खोदकामात एकूण 140 बालकांचे अवशेष मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या रिपोर्टनुसार, मृत बालकांचे वय 5 ते 14 वर्षांदरम्यान असावे.

- बळी स्थळाच्या जवळ आढळलेले कपडे आणि इतर वस्तूंच्या कार्बन डेटिंग (वय माहिती करण्याची पद्धत) वरून कळले की, ही घटना इ.स. 1400 ते 1450 दरम्यानची असावी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...