आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लास वेगास : कारच्या विंडशिल्डमधून फिल्मी स्टाइलने गुंडांवर झाडली गोळी, बॉडीकॅमचा Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजल्स - लास वेगास पोलिसांनी बॉडीकॅमऱ्याने शूट केलेला एक फोटो सोमवारी जारी केला. त्यात एक पोलिस गुंडांच्या कारचा पाठलाग करताना दिसत आहे. त्याने अगदी फिल्मी स्टाइलने कारच्या विंडस्क्रीनमधून गुंडांवर फायरिंगही केले. हल्ल्यात एका गुंडाचा समावेश झाला आहे. तर दुसऱ्याला अटक करण्यात आली आहे. एका गुंडाचा या चकमकित मृत्यू झाला. तर दुसऱ्याला अटक करण्यात आली होती. 


लास वेगास पोलिसांच्या मते, ही घटना 11 जुलैची आहे. त्यावेळी फिदेल मिरांडा (23) आणि रेने नुआंज (30) ने पोलिसांवर 34 राऊंड फायरिंग केले. त्यामुळे पोलिसांच्या गाडीवर गोळ्यांचे व्रण पडले. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 32 राऊंड फायरिंग केले. मिरिंडाचा या चकमकित मृत्यू झाला. तर नुआंजला अटक करण्यात आली. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार दोन्ही गुंडांवर 25 वर्षाच्या एका तरुणाला अनेक गोळ्या घातल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...