आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती दिसत होती चिमुकली, मग आई-वडिलांसमोर आले धक्कादायक सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील न्यूजर्सी येथे राहणाऱ्या पॉल रिब्किन आणि केरेन रोड्स यांची मुलगी जन्मापासूनच कमकुवत होती. जन्म घेतल्याच्या 20 आठवड्यातच तिच्या पोटाचा आकार वाढण्यास सुरुवात झाली. काही महिन्यांतच पोट इतके फुगले की आई-वडील प्रचंड घाबरले. आपली मुलगी गर्भवती झाली की काय अशा भितीने त्यांच्या मनात घर केले होते. 

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
मॅडी असे त्या चिमुकलीचे नाव असून तिच्या जन्मापूर्वी या कपलने आपला एक मुलगा गमावला होता. त्यांचा मुलगा नॅथेनियल जन्मल्याच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यूमुखी पडला. त्याला Polycystic Kidney Disease होता. यात किडनीत दगडासारख्या Cyst (पस आणि कॅव्हिटीने भरलेल्या गाठी) तयार होते. यात किडनी काम करणे बंद करते. हाच आजार मॅडीला देखील झाला होता. वैद्यकीय चाचण्या घेतल्या असता हा आजार पॉल आणि केरेन यांच्यातून अनुवांशिकरीत्या त्यांच्या मुलांना झाल्याचे निष्पन्न झाले. जन्म घेतल्याच्या 7 महिन्यांपर्यंत मॅडीला रुग्णालयात ठेवावे लागले होते. तरीही दीड वर्षांची झाली तेव्हा तिच्या किडनीने काम करणे बंद केले. मुलगा तर गेला आणि मुलगी सुद्धा जाणार अशा भितीत ते जगत होते.


वडिलांनी दिली किडनी
मॅडीला वाचवण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उरला होता. डोनर सापडत नसल्याने वडील पॉल यांनीच आपल्या मुलीला किडनी देण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 2016 मध्ये या मुलीला तिच्या वडिलांची किडनी लावण्यात आली. या शस्त्रक्रियेला दोन वर्षे झाली आहेत. तिच्या पोटाचा आकार अजुनही काहीसा मोठा असला तरीही ती सुखरूप आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या मुलीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...