आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट पार्टीत या मुलीवर फिदा झाला होता राजा, महाराणी बनवून आणले राजवाड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराणी लला सलमा. - Divya Marathi
महाराणी लला सलमा.

एखाद्या राजाचा राज्यातील एखाद्या सामान्य मुलीवर पाहिल्या नजर भेटीतच जीव जडावा आणि त्याने तिला राणी बनवून राजवाड्यात घेऊन यावे.  हे हिंदी चित्रपटाला शोभेल असे कथानक आहे,  मोरक्कोच्या राजा-राणीच्या प्रेमाचे. सामान्य घरात जन्मलेल्या सलमाला पाहाताक्षणी मोरक्कोचे किंग मोहम्मद तिच्यावर फिदा झाले. भेटीचे मैत्रीत, मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि शिक्षकाच्या घरात जन्मलेली सलमा किंग मोहम्मद सोबत लग्न करुन रॉयल फॅमिलीची सदस्य झाली आहे. 

 

कोण आहेत राजा-राणी

ही कहाणी आहे मोरक्कोच्या राजा-राणीची. हा देश 'किंगडम ऑफ मोरक्को' नावानेही प्रसिद्ध आहे. येथील किंग मोहम्मद-6 यांनी वडील किंग हसन द्वितीय यांच्या मृत्यूनंतर राजगादी सांभाळली आहे. किंग मोहम्मदची लव्हस्टोरी प्रसिद्ध आहे. एका खासगी पार्टीमध्ये एका सामान्य मुलीला पाहून ते प्रेमात पडले होते. 

 

फिल्मी आहे राजा-राणीची प्रेम कहाणी
- किंग मोहम्मद आणि त्याची महाराणी सलमा यांची भेट 1999 मध्ये एका खासगी पार्टीत झाली होती. पहिल्या भेटीतच किंग मोहम्मद हे सलमाच्या प्रेमात पडले. 
- दोघांची भेट झाली. भेटी वाढत गेल्या, आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, रितसर लग्न झाले. तोपर्यंत सलमा एक सामान्य मुलगी होती. 
- 21 मार्च 2002 मध्ये लग्न झाल्यानंतर सलमा रॉयल फॅमिलीची मेंबर झाली आणि तिला नाव मिळाले लला सलमा. 

 

कोण आहे महाराणी सलमा 
- महाराणी लला सलमाचा जन्म एका सामान्य शिक्षकाच्या घरी झाला होता. कुटुंबियांनी तिचे नाव सलमा बेनानी ठेवले होते. 
- किंग मोहम्मद यांच्यासोबत सलमाची भेट झाली तेव्हा तिने शिक्षण पूर्ण केले होते आणि इन्फर्मेशन इंजिनिअर म्हणून काम करत होती. 
- आज लला सलमा देशातील सर्वात मोठ्या कंपनीची ओनर आहे. 
- किंग मोहम्मदच्या कंपनीमध्ये लला सलमा गुंतवणूकदारही आहे. 
- किंग मोहम्मद-6 आणि लला सलमा यांना दोन मुलं आहेत. त्या ब्रेन आणि ब्यूटीचा अनोखा मिलाफ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याला आता मनीची साथ लाभली आहे. 

 

जगातील श्रीमंतांच्या यादीत आहे किंग 
- 2014 मध्ये फोर्ब्स मॅगजीनने दिलेल्या माहितीनुसार, किंग मोहम्मद यांच्याकडे 2.1 अब्ज डॉलर अर्थात 13,623 कोटी एवढी संपत्ती आहे.   
- जगातील मोजक्या श्रीमंतांपैकी ते एक आहेत.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मिशेल ओबामांसोबत लला सलमा 

बातम्या आणखी आहेत...