आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये आणीबाणी लागू; विरोधी पक्षनेत्यासह सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायाधीशांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन - Divya Marathi
राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन

मले - मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांनी देशात 15 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. यासोबतच सुरक्षा रक्षकांनी मुख्य विरोधी पक्ष नेता आणि माजी राष्ट्राध्यक्ष मौमून अब्दुल गयूम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्ता उलथवण्याच्या कट रचल्याचे आरोप आहेत. आणीबाणी लागू केल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांना देखील अटक केली. तसेच कोर्टाला लॉक त्यामध्येच न्यायाधीशांना नजरकैद केले. 

 

विद्यमान, माजी राष्ट्राध्यक्ष एकमेकांचे सावत्र भाऊ...
- अटक करण्यात आलेले माजी राष्ट्राध्यक्ष गयूम विद्यमान राष्ट्राध्यक्ष यमीन यांचे सावत्र भाऊ आहेत. गयूम यांनी मालदीवमध्ये 30 वर्षे सत्ता गाजवली. 2008 मध्ये बहुपक्षीय निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 
- यानंतर मालदीवची सत्ता नशीद यांच्या हातात गेली. पण, अब्दुल्ला यमीन यांनी नशीद यांची सत्ता उलथवली तसेच भ्रष्टाचाराचे खटले दाखल करून देश सोडण्यास मजबूर केले. 
- 2013 पासून मालदीवच्या सत्तेवर अब्दुल्ला यमीन विराजमान आहेत. तेव्हापासूनच नशीद ब्रिटनमध्ये शरणार्थी म्हणून राहत आहेत. 
- आपले सावत्र भाऊ गयूम यांच्यावर अटकेची कारवाई करून मालदीवमध्ये आपलीच ताकद असल्याचे यमीन यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कारवाई शक्ती प्रदर्शन असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...