आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्टअटॅकनंतर डॉक्टरांनी Dead घोषित केले होते, पण पुढच्याच क्षणी झाला जिवंत, सांगितली हकिगत..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये एक व्यक्ती मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाली आणि तिने दावा केला की, ईश्वराला पाहिले आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमधील रहिवासी चार्लीला तीव्र हार्टअटॅक आला होता. यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले. परंतु काही वेळानंतरच चार्लीच्या शरीरात अचानक जीव आला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मग चार्लीने डॉक्टर्स आणि आपल्या परिवाराला मृत्यूनंतरच्या अनुभवाबाबत सांगितले.

 

ती पांढरी खोली होती....
- चार्ली म्हणाला, मला माहिती नाही की, मी 2 सेकंदासाठी की दोन तासांसाठी आपल्या शरीराबाहेर होतो. मला छातीत भयंकर वेदना झाल्या. यानंतर मी एक पांढऱ्या खोलीत असल्याचे आढळले. चहुकडे फक्त पांढऱ्याच चीजवस्तू होत्या. मी एका जुनाट लाकडी खुर्चीवर बसलेलो होतो. माझ्यापासून काही अंतरावर 2 जण बसलेले होते. पैकी एक खूप शक्तिशाली होता.

- चार्ली म्हणाला, त्या शक्तिशाली व्यक्तीच्या हातात एक भलीमोठी अंगठी होती. ती अंगठी जुन्या काळची वाटत होती. जशी अनेक राजे-महाराजे आपल्या एखाद्या निर्णयानंतर मोहोर लावण्यासाठी त्याचा वापर करतात. मला फार काही स्पष्ट दिसत नव्हते, परंतु अचानक माझी नजर दुसरीकडे गेली, तेव्हा तिसऱ्या खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती दिसली, ती माझ्या वडिलांसारखी होती. मी त्यांना बोलताना ऐकले तेव्हा मला ते माझे वडीलच असल्याची खात्री मला पटली. समोर बसलेली व्यक्ती माझ्या वडिलांशी बोलत होती. अचानक त्या व्यक्तीने म्हटले, चिंता करू नकोस, तू ठीक होशील! हे ऐकताच मला जोरदार झटका बसला आणि मग मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे मला दिसले.

 

लोक म्हणतात, दुसरा जन्म...
- चार्ली नावाच्या या व्यक्तीने या पूर्ण घटनेचा उल्लेख आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे. चार्लीची हकिगत वाचल्यानंतर पॅरानॉर्मल एक्स्पर्ट्स आणि काही धर्मगुरूंचे म्हणणे आहे की, चार्लीला दुसरे जीवन देण्यात आले आहे. त्याच्या चांगल्या कर्मामुळे तसेच पूर्वजांमुळे त्याचा मृत्यू टळला.

 

 

बातम्या आणखी आहेत...