आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING : 62 व्या मजल्यावर करत होता स्टंट, रेकॉर्ड झाला Live मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या एका युवकाला 62 व्या मजल्यावर स्टंट करणे जिव्हारी गेले आहे. नेहमीच धोक्याच्या उंच ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्यात 26 वर्षीय वु योंगनिंग याला थ्रिल वाटायचा. याच थ्रिलसाठी तो हुआन प्रांतातील 62 मजली हुआयुआन इंटरनॅशनल सेंटरच्या छतावर पोहोचला आणि त्याच ठिकाणी सेल्फी व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा ऑन केला. मात्र, हा सेल्फी व्हिडिओ त्याच्या मृत्यूचा लाइव्ह व्हिडिओ ठरला. त्याच्या गर्लफ्रेंडने मात्र, वेगळीच स्टोरी सांगितली.

 

लग्नासाठी करत होता स्टंट..?
> 26 वर्षीय वु याचा मृतदेह त्याच इमारतीवरील एका खिडकीच्या आडोश्याला सापडला. सर्वप्रथम विन्डो क्लीनरला त्याची बॉडी सापडली. त्यानेच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. तो जेथून पडला तेथून त्या खिडकीचे अंतर 45 फुट होते.
> या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड जिन-जिनने बीजिंग न्यूजशी संवाद साधला. तिने सांगितल्याप्रमाणे, तो या स्टंटनंतर दोघांच्याही पालकांकडून लग्नाची परवानगी घेणार होता. 
> त्याने आपल्याला व कुटुंबियांना लग्नात 8 लाखांचे गिफ्ट देणार असेही आश्वस्त केले होते. हीच रक्कम त्याला स्टंटच्या व्हिडिओतून मिळणार होती. 
> वु वोल्कॅनो या सोशल मीडियावर एक स्टार होता. अशाच स्टंटचे 300 व्हिडिओ असलेल्या त्या साइटवर त्याचे 10 लाख फॉलोअर्स होते. एका लाइव्ह व्हिडिओसाठी त्याला जवळपास 5 लाख रुपये मिळायचा. या व्हिडिओसाठी 8 लाख मिळतील अशी अपेक्षा त्याने केली होती. पोलिसांनी या घटनेला एक अपघात म्हणून तपास गुंडाळला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि तो चित्तथरारक व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...