आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी म्हणाली- रोनाल्डो मेसीपेक्षा श्रेष्ठ, नाराज पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वर्ल्डकपमध्येच फुलले होते प्रेम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियात सुरू असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीना आणि पोर्तुगालचे संघ बाहेर झालेले आहेत. परंतु, या दोन्ही संघांच्या समर्थकांदरम्यान अजूनही याबाबत वाद होतोय की, लियोनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोमध्ये कोणत उत्कृष्ट खेळाडू आहे? ताजी घटना यजमान देश रशियातील आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या अपनी पत्नीला याच कारणावरून घटस्फोटाची नोटीस पाठवली, कारण ती रोनाल्डोला मेसीपेक्षा श्रेष्ठ म्हणाली होती.

 

ही घटना 26 जूनची आहे. त्या दिवशी अर्जेंटिनाने नायजेरियाला 2-1 ने हरवले होते. या विजयानंतर आर्सेन नावाच्या व्यक्तीने मेसीच्या उत्कृष्ट खेळावर जल्लोष करायला सुरुवात केली. यादरम्यान त्याची पत्नी ल्युडमिलाने रोनाल्डोला मेसीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगत आर्सेनला चिडवायला सुरुवात केली. यावरून आर्सेन नाराज झाला. मग आर्सेनने रागाच्या भरात घर सोडले. एवढेच नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ल्युडमिला घटस्फोटाची नोटीसही पाठवली.

 

2002 वर्ल्डकपदरम्यान पडले होते प्रेमात:
रशियन वृत्तपत्र ‘आर्गुमेंतो आई फाक्ती’ला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये आर्सेनने सांगितले की, तो आणि ल्युडमिला 2002 वर्ल्डकपदरम्यान भेटले होते. काही दिवसांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आर्सेन म्हणाला की, या वर्ल्डकपमध्ये ल्युडमिला सातत्याने त्याला मेसीच्या नावावर चिडवत राहिली. सोबतच आइसलँडविरुद्ध मेसीने पेनल्टी सोडण्यावरही टोमणे मारत होती. याचमुळे मी घर आणि ल्युडमिला दोघांनाही कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला.

 

बातम्या आणखी आहेत...