आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मेरीलँडमध्ये वृत्तपत्र कार्यालयावर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, आरोपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन- अमेरिकेत एनापोलिस राज्याची राजधानी मेरीलँडमध्ये गुरूवारी कॅपिटल या वृत्तपत्राच्या कार्यालयात शस्त्रधारी हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केला. यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हा हल्ला पुर्वनियोजित होता असे पोलिस सांगत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती दुख: व्यक्त केले आहे.


पोलिसांनी अतापर्यंत हल्लेखोराची ओळख उघड केलेली नाही. हल्लेखोरांनी कोणत्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला, याविषयीचा खुलासा केला आहे. वृत्तपत्राचे क्राईम रिपोर्टर फिल डेविस यांनी घटनेविषयी ट्विट करून सांगितले की, हल्लेखोरांनी काचेच्या दरवाज्याच्या मागून लोकांवर अंधाधुंध गोळीबार केला.

 

अमेरिकेत गोळीबारींच्या घटनांमुळे बंदूक बाळगण्याचा कायदा अधिक कडक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये फ्लोरिडा येथील हायस्कूलमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात 17 आणि मे मध्ये टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबारामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

आरोपींचा उद्देश कळू शकले नाही....
ऐन अरुंडेल काउंटीचे पोलिस चीफ बिल क्राम्फ यांनी सांगितले की, कॅपिटल वृत्तपत्राला सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली होती. ही धमकी कोणाच्या अकाउंटवरून देण्यात आली, याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु, आरोपीने केलेल्या हल्ल्यामागील उद्देश कळू शकलेला नाही. 


कॅपिटलचे संपादक जिमी डिबट्स म्हणाले की, ही घटना हादरून सोडणारी आहे. सध्या अधिक काही बोलण्याची मनस्थिती नाही. मला फक्त एवढेच माहित आहे की, आमचे रिपोर्टर्स आणि एडिटर्स आठवड्यात 40 तास काम करत नाही, त्यांचा पगार देखील जास्त नाही. परंतु, त्यांच्यात बातमी शोधण्याचे कौशल्य भरभरून आहे.

 

अमेरिकी नागरिकांकडे सर्वाधिक शस्त्रे
द स्मॉल आर्म्स सर्वेनुसार, जगात समान्य माणसांकडे जेवढे हत्यारे आहेत. त्यातील 46% अमेरिकी लोकांकडे आहेत. अमेरिकी नागरिक दरवर्षी 1 कोटी 40 लाख नवे हत्यार करेदी करतात. अहवलात, ज्या वैध-अवैध स्वरूपात लोकांकडे हत्यार असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यात हँडगन, रायफल, शॉटगन आणि मशीगन या शस्त्रांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...