आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • अमेरिकेच्या First Ladyने घातले ‘I Dont Care’ लिहिलेले जॅकेट, ट्रम्पना द्यावे लागले स्पष्टीकरण Melania Trump Wears I Really Dont Care Coat On Migrant Visit

अमेरिकेच्या First Ladyने घातले ‘I Dont Care’ लिहिलेले जॅकेट, ट्रम्पना द्यावे लागले स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मेलानियांचे प्रवक्ते म्हणाले, यात कोणताही छुपा मेसेज नव्हता.

- मेलानिया वॉशिंग्टन एअरबेसवर पुन्हा तोच जॅकेट घातलेल्या दिसल्या.

 

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प गुरुवारी प्रवासी मुलांची भेट घेण्यासाठी टेक्सासला गेल्या होत्या. तेथून परतत असताना त्यांनी एक जॅकेट घातला होता. ज्यावर लिहिले होते- 'I Dont Care, Do You?' म्हणजेच मला पर्वा नाही, तुम्हाला आहे? या मेसेजमुळे त्यांचा हा दौरा चर्चेत आला. फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मेलानियांचा विरोध होऊ लागला. यानंतर ट्रम्प यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले.

मेलानिया यांचे प्रवक्ते म्हणाले, "यात कोणताही छुपा मेसेज नाहीये. " दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले की, हा मेसेज फेक न्यूज (खोट्या बातम्या) वरून होता. फोटो व्हायरल झाल्याच्या काही तासांनंतर मेलानिया वॉशिंग्टन एअरबेसच्या बाहेर पुन्हा तोच जॅकेट घातलेल्या दिसून आल्या. जेव्हा पत्रकारांनी यावरून त्यांना प्रश्न केला, तेव्हा त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.

 

प्रवासी धोरणावरून ट्रम्प अडचणीत: 
अमेरिकेने नुकतेच तेथे अवैध रीतीने आलेल्या शरणार्थींसाठी नवे नियम बनवले होते. याअंतर्गत, शरणार्थींना त्यांच्या मुलांकडून वेगळे केले जात होते. याला प्रचंड विरोध झाला. मेलानिया आणि ट्रम्प यांच्या पक्षातील काही खासदारांनीही याला विरोध केला होता. गुरुवारी ट्रम्प यांनी आपला हा निर्णय मागे घेतला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...