आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन संसदेत जाणारी दुसरी भारतीयवंशाची महिला बनू शकते अरुणा, निवडणुकीसाठी गोळा केले 9 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हच्या निवडणुकीसाठी भारतीय वंशांच्या अरुणा मिलर (53) मैदानात आहेत. मेरीलँड मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्या इच्छूक आहेत. 26 जून रोजी येथे प्रायमरी इलेक्शन होणार आहे. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी या आपल्याच पक्षाच्या डेव्हिड ट्रोन यांना त्या आव्हान देणार आहेत. या प्रायमरी इलेक्शनमध्ये अरुणा विजयी झाल्या तर त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळेल आणि हाऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हसाठी त्या मेरीलँड येथून निवडणूक लढवतील. निवडणूक प्रचारासाठी त्यांनी आपल्या समर्थकांकडून 1.36 मिलियन डॉलर (जवळपास 9.26 कोटी रुपये) गोळा केले आहेत. अरुणा विजयी झाल्यातर प्रमिला जयपाल यांच्यानंतर अमेरिकन संसदेत पोहोचणाऱ्या त्यात दुसऱ्या भारतीय महिला असतील. प्रमिला जयपाल या  2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत यूएस हाऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हच्या सदस्य झाल्या होत्या. 

 

आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अरुणांनी केला कमी खर्च 
- डेमोक्रॅटिक पक्षासाठी फंड गोळा करण्यात अरुणा मिलर यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. असे असले तरी प्रायमरी इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रोन यांच्यापेक्षा कमी पैसा खर्च केला आहे. 
- डेमोक्रॅटिक पार्टीचे ट्रोन यांनी 10 मिलियन डॉलर (जवळपास 68 कोटी रुपये) खर्च केले आहेत. अरुणा आणि ट्रोन यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण अमेरिकन मीडियाचे लक्ष आहे. 
- वॉशिंग्टन पोस्टने या निवडणुकीवरुन एक प्रश्न विचारला आहे, 'महिलांना समर्पित या वर्षात, 10 मिलियन डॉलर खर्च करणारा उमेदवार हॉऊस ऑफ रिप्रेझिटेंटिव्हमध्ये जाऊ शकतो?' 
- मेरीलँड हा मतदारसंघ वॉशिंग्टनमध्ये आहे. या मतदारसंघावर डेमोक्रॅटिक पार्टीचे वर्चस्व मानले जाते. 

 

हैदराबादच्या आहेत अरुणा 
- अरुणा मिलर यांचा जन्म 1972 साली हैदराबादमध्ये झाला होता. त्यांनी येथून सिव्हिल इंजिनिअरिंग केले. 2010 मध्ये मेरीलँड स्टेट डेलिगेट म्हणून त्या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांना मेरीलँड येथील भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला होता. 
- अरुणा यांनी शरणार्थींसाठीच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वास दिले आहे. त्या म्हणाल्या, यूएस काँग्रेससाठी माझी निवड झाली तर माझी प्राथमिकता ही शरणार्थी राहातील. अमेरिकेत नागरिकत्व मिळवण्यासाठी एक सरल योजना तयार असण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...